शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं पडलं महागात; नववर्षाच्या पहिल्याच रात्री मोटार बुडाली धरणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 20:14 IST

वाहनासह जलाशयात गेलेल्या या तीन लोकांनी वाहनाच्या काचा फोडून आपली सुटका करून घेतली

राजगुरुनगर : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकमान धरण जलाशयात चारचाकी मोटार बुडाल्याचे सोमवारी सकाळी आढळले. रविवारी (दि.१) नववर्षाच्या पहिल्याच रात्री हि घटना घडली असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. वेताळे-साकुर्डी (ता.खेड) रस्त्यावरील चासकमान धरणातील चाळीसगाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ हि घटना घडल्याचे दिसून आले. परंतु हा प्रकार नक्की घातपात की अपघात, याचा शोध खेड पोलीस घेत आहेत.       सोमवारी सकाळी चासकमान धरणाच्या जलाशयात पांढऱ्या रंगाची इको मोटार बुडाल्याचे खेड पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी या वाहनात कोणीही नव्हते. धरण जलाशय परिसरातील एका खासगी रिसॉर्टमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना साकुर्डी रस्त्यावरून हे वाहन धरण जलाशयात कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सकाळी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातावेळी वाहनात तीन लोक होते. वाहनासह जलाशयात गेलेल्या या तीन लोकांनी वाहनाच्या काचा फोडून आपली सुटका करून घेतल्याची माहिती स्थानिक नागरिक देत आहेत. परंतु स्वतः मद्यधुंद अवस्थेत असताना त्यात वाहन पाण्यात बुडालेले असताना वाहनाच्या काचा फोडून सुटका केलीच कशी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला चासकमान धरणाचा विस्तीर्ण जलाशय आहे. डोंगर, पाणी व झाडाझुडपांच्या  परिसरात दिवसा तुरळक वर्दळ असते, तर रात्रीच्या वेळी हा परिसर पुर्णतः निर्जन असतो.

टॅग्स :PuneपुणेDamधरणPoliceपोलिस31st December party31 डिसेंबर पार्टी