मद्यपी चालकाचा पाच तास धिंगाणा

By Admin | Updated: October 15, 2016 02:59 IST2016-10-15T02:59:04+5:302016-10-15T02:59:04+5:30

स्वारगेट स्थानकातून संचेती रुग्णालय मार्ग अर्ध्या तासातच एसटी वल्लभनगरच्या आगारात पोहचविली़ मात्र, संशयामुळे त्यास पकडल्याने एसटीतील ३५ ते ३८ प्रवाशांचा जीव

Drunk driver for five hours | मद्यपी चालकाचा पाच तास धिंगाणा

मद्यपी चालकाचा पाच तास धिंगाणा

पिंपरी : स्वारगेट स्थानकातून संचेती रुग्णालय मार्ग अर्ध्या तासातच एसटी वल्लभनगरच्या आगारात पोहचविली़ मात्र, संशयामुळे त्यास पकडल्याने एसटीतील ३५ ते ३८ प्रवाशांचा जीव वाचून मोठी दुर्घटना टळली़ त्यानंतर वल्लभनगर बसस्थानकाच्या ठिकाणी मद्यपी एसटी चालकाने सुमारे पाच तास धिंगाणा घालत प्रशासनाला वेठीस धरले. अखेर पोलिसांनी चव्हाण याच्यावर मोटार वाहन कायद्याने संत तुकारामनगर येथील चौकीत गुन्हा दाखल केला.
स्वारगेट स्थानकातून संतोष माने याने एसटी पळवून काही वर्षांपूर्वी दहशत निर्माण केली होती़ तशीच काही स्थिती मद्यपान करून स्वारगेट बसस्थानकातून गाडी चालविणाऱ्या चव्हाण याने केल्याचे प्रवाशांनी सांगितले. ते म्हणाले, गुरुवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी भुम आगारातून मुंबईला निघालेली एसटी (एमएच २० बीएल२७०६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात पोहचली़ लांब पल्ल्याच्या गाडीला जंपिंग चालक असल्याने भुम आगारातील चालकाने एसटी स्वारगेट स्थानकात पोहचविली़ दहा मिनिटांनंतर स्वारगेटवरून बोरिवलीस जाण्यासाठी दुसरा चालक म्हणून लीबराज चव्हाण यांच्याकडे एसटीची जबाबदारी देण्यात आली. मात्र, चव्हाण यांनी अगोदरच मद्यपान केले असल्याने त्याने भरदाव वेगाने अर्ध्या तासाच्या आतमध्ये एसटी वल्लभनगर आगारात पोहचविली़.
(प्रतिनिधी)

Web Title: Drunk driver for five hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.