राष्ट्रवादीकडून प्रभागात औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:10 IST2021-04-02T04:10:32+5:302021-04-02T04:10:32+5:30

पुणे : वडगावशेरी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यावर ...

Drug spraying in the ward by the NCP | राष्ट्रवादीकडून प्रभागात औषध फवारणी

राष्ट्रवादीकडून प्रभागात औषध फवारणी

पुणे : वडगावशेरी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यावर जागृती करीत राष्ट्रवादी काँग्रेसने औषध फवारणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांनी वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबवली. गलांडे स्वखर्चाने प्रभागातील सोसायट्या, वसाहत, रुग्णालये, शाळा, धार्मिक स्थळे येथे औषध फवारणी करत आहेत.

गलांडे म्हणाले की, प्रभागात माझे कुटुंब माझी जबाबदारी या तत्वावर काम सुरू आहे. नागरिकांनी विनामास्क फिरू नये. रस्त्यावर विनाकारण गर्दी करू नये. वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करा. कोरोनासदृश लक्षणे आढळून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Drug spraying in the ward by the NCP