पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:10 IST2021-05-19T04:10:10+5:302021-05-19T04:10:10+5:30

पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी सांगितले की, राज्यातील कोरोना योद्धे असलेले पोलीस कशाचीही भीती न बाळगता ...

Drug spraying at the police station on behalf of the Police Friends Association | पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये औषध फवारणी

पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये औषध फवारणी

पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी सांगितले की, राज्यातील कोरोना योद्धे असलेले पोलीस कशाचीही भीती न बाळगता कोरोनाविरोधी लढ्यात पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत, मात्र त्यांच्या कामकाजाच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी पोलीस मित्र संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. ॲडिशनल एस. पी. ऑफीस, डी. वाय. एस. पी. ऑफीस, बारामती शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, वालचंद नगर पोलीस स्टेशन, भवानीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. या वेळी भवानीनगर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार प्रभाकर बनकर ,संघटनेच्या पुणे जिल्हा महिला संघटक शुभांगी चौधर, इंदापूर तालुकाध्यक्ष दीपक खाडे, वालचंदनगरचे सरपंच कुमार गायकवाड, विकास भोईटे यावेळी उपस्थित होते.

पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी.

Web Title: Drug spraying at the police station on behalf of the Police Friends Association