पुण्यात अपहरणाच्या तपासातून ड्रग्ज रॅकेट उघड; तब्बल ७६ जण पोलिसांच्या रडारवर

By किरण शिंदे | Updated: April 1, 2026 21:28 IST2026-04-01T21:26:58+5:302026-04-01T21:28:32+5:30

तपासादरम्यान आरोपीने अनेक तरुणांना ड्रग्ज विक्री केल्याची कबुली दिली. तसेच, त्याने ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या इतर तिघांची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे.

Drug racket exposed in Pune kidnapping investigation; 76 people on police radar | पुण्यात अपहरणाच्या तपासातून ड्रग्ज रॅकेट उघड; तब्बल ७६ जण पोलिसांच्या रडारवर

पुण्यात अपहरणाच्या तपासातून ड्रग्ज रॅकेट उघड; तब्बल ७६ जण पोलिसांच्या रडारवर

  किरण शिंदे    

पुणे शहरात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या तपासादरम्यान ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले आहे. प्रेमप्रकरणातून झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना ड्रग्ज व्यवहाराचे धागेदोरे मिळाले असून, या प्रकरणात तब्बल ७६ जणांची नावे समोर आली असून आता हे सर्वजण पोलिसांच्या रडारवर आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील उत्तमनगर पोलिस ठाण्यात १७ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची माहिती होती. तपासादरम्यान पोलिसांना मुख्य आरोपी सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या राठोड याच्याबाबत धक्कादायक माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत त्याला कोंढवे धावडे परिसरातून अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेला राठ्या राठोड हा ड्रग्ज व्यवहारात सक्रिय असल्याची माहिती समोर आली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना मेफेड्रोन (MD) मिळाले. उत्तमनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान सुनील राठोड, राजन नायर, जतीन कदम (रा. वारजे) आणि शुभम दहिभाते (रा. कोंढवे धावडे) यांची नावे समोर आली.  त्यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपी राठ्या राठोडच्या मोबाईलची तपासणी करताना पोलिसांना मोठा धक्का बसला. मागील चार महिन्यांत त्याच्या खात्यातून सुमारे ३०० हून अधिक जवळपास ९ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले.

तपासादरम्यान आरोपीने अनेक तरुणांना ड्रग्ज विक्री केल्याची कबुली दिली. तसेच, त्याने ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या इतर तिघांची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये ड्रग्ज विक्रेते आणि ग्राहक मिळून ७६ जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे शहरात मोठे ड्रग्ज नेटवर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत असून, या रॅकेटमधील इतर संबंधितांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे आणि उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

Web Title : पुणे: अपहरण जाँच में ड्रग्स रैकेट का खुलासा; 76 जांच के दायरे में।

Web Summary : पुणे में एक अपहरण मामले की जांच में 76 लोगों से जुड़े ड्रग्स रैकेट का खुलासा हुआ। नाबालिग के अपहरण की जांच करते हुए पुलिस को ड्रग्स के सौदे का पता चला। गिरफ्तारियां हुई हैं, और एक बड़े नेटवर्क का पता चला है। आगे की जांच जारी है।

Web Title : Pune: Kidnapping investigation uncovers massive drug racket; 76 under scrutiny.

Web Summary : A Pune kidnapping case revealed a drug racket involving 76 individuals. Police discovered drug dealings while investigating a minor's abduction. Arrests have been made, and a large network is uncovered. Further investigation is underway.