शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थांचा जाळ अन् धूर; स्वस्ताईने आलाय गांजाचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:51 IST

उद्योगांच्या शहरातून निघतोय अमली पदार्थांचा धूर?

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही वर्षांपासून अमली पदार्थांची तस्करी होत आहे. शहर आणि परिसरात अमलीविरोधी पथकाने चार महिन्यांत ३४४ किलो ११ ग्रॅम गांजा जप्त केला. गांजा सेवन आणि विक्रीप्रकरणी ३१ गुन्हे दाखल झाले आहेत, तर ५३ आरोपींवर कारवाई केली आहे. गांजाबरोबरच शहरात ब्राउन शुगर प्रकरणी २ दोन गुन्हे दाखल आहेत, तर १३३ ग्रॅम ब्राउन शुगर जप्त केली असून, चार जणांवर कारवाई केली आहे.यावरून शहरात अमली पदार्थांची तस्करी वाढत असल्याचे दिसून येते.

गांजा आणि ब्राउन शुगरबरोबरच अवैधरीत्या दारू विक्री, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि काही सिगारेट या प्रकारच्या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे दिसून येते. गांजा हा इतर अमली पदार्थांच्या तुलनेत कमी पैशात आणि सहज उपलब्ध होते. परिणामी, शहरात गांजाचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे अमलीविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत दिसून येते.

पूर्वी असा समज होता की, शहरातील काही विशिष्ट भागातच अमली पदार्थांचे सेवन केले जाते, परंतु सद्यस्थिती तशी नाही. आता शहराच्या उच्चभ्रू भागातही अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री केले जाते. पिंपरी-चिंचवड शहर मागील काही वर्षांत उद्योगांचे शहर म्हणून नावारूपास आले आहे. परिणामी, रोजगारासाठी, शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, तसेच शहराला लागूनच आयटी क्षेत्र असल्याने, देशभरातील नागरिक येथे आहे. यामुळे काही वर्षांत शहराचा विस्तार झाला. नवनवीन भाग विकसित झाले. यामुळे शहराचा विकासही झाला, परंतु हे सगळं होत असतानाच, शहरातील गुन्हेगारी वाढली, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

काही महिन्यांतील मोठ्या कारवाया-

  • हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बाळू महादेव वाघमारे याच्याकडून ३० किलो गांजा जप्त
  • हिंजवडीतील राक्षेवस्ती येथे विकास विनोद मोंडळ याच्याकडून ३७ किलो गांजा जप्त
  • चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चेतन हरिराजी पुरोहित व त्याच्या साथीदाराकडून ९८ किलो गांजा जप्त
  • चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गोकुळ शिवाजी आगे याच्याकडून १९७ किलो गांजा जप्त

 

अमली पदार्थांची चार महिन्यांतील कारवाईचार महिन्यांतील कारवाई (२१ मे पर्यंत) प्रकार, दाखल गुन्हे, आरोपी संख्या, जप्त माल, किंमत

गांजा विक्री : १५, २९, २४३ कि. ८९७ ग्रॅम, १ कोटी ७ लाख, ७६ हजार ३गांजा सेवन : १६, २४, ११४ ग्रॅम, १७ हजार ७०

ब्राऊन शुगर : २, ४, १३३ ग्रॅम, ६ लाख ६७ हजार २००एकूण : ३३, ५७, ३४४ कि. ११ ग्रॅम गांजा, १ कोटी १४ लाख ४४ हजार ९७३

                         (१३३ ग्रॅम. ब्राऊन शुगर)इतर कारवाई

प्रकार, दाखल गुन्हे, आरोपी संख्या, किंमतप्रोव्हिबिशन, ६३, ७८, ३४ लाख ९३ हजार ७००

कोटपा, १६, १६, ५ लाख २६ हजार १६१गुटखा, १२, १९, १७ लाख ५ हजार ६८५

जुगार, ३, ६, ९७ हजार ७५०एकूण : ९४, ११९, ५८ लाख २३ हजार २९६

दोन्ही मिळून, १२७, १७६, १ कोटी ७२ लाख ६८ हजार २६९

ड्रग्जचे कनेक्शन छोटा राजन टोळीपर्यंत ?अंमली पदार्थ विरोधी पथकाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शहरात विक्रीसाठी वाहनात लपून आणलेला १९८ किलो गांजा जप्त केला होता. हा गांजा ओडिसावरून आणल्याचे तपासात उघड झाले होते. तसेच ऑक्टोबर २०२० मध्ये चाकण येथे जप्त केलेले मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज प्रकरणाचे कनेक्शन छोटा राजन टोळीपर्यंत पोहोचले होते.

पोलिसांनी छोटा राजन टोळीत पूर्वी सक्रिय असलेला सराईत गुन्हेगार आणि एका नायजेरियन व्यक्तीसह चौदा जणांना अटक केली होती. या आरोपींना रांजणगाव येथील एका बंद पडलेल्या फार्मा कंपनीत १३२ कोटी किमतीचे १३२ किलो एमडी ड्रग्ज तयार केल्याचे समोर आले होते. या कारवायांवरून पिंपरी-चिंचवड शहरात अंमली पदार्थांची तस्करी खोलवर पोहोचली आहे, हे दिसून येते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी