शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थिती : चासकमानचे दुसरे आवर्तन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 00:18 IST

खेड सह शिरुर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या हुतात्मा राजगुरु जलाशय चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तब्बल सत्तावन्न दिवसांनंतर म्हणजेच शुक्रवारी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले.

चासकमान : खेड सह शिरुर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या हुतात्मा राजगुरु जलाशय चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तब्बल सत्तावन्न दिवसांनंतर म्हणजेच शुक्रवारी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले. धरणात सध्या ४४.१२% टक्के अर्थात ४.३० टीएमसी इतका पाणीसाठी राहिला आहे. त्यातील ३.३४ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी याच तारखेला (७.४४) टीएमसी शिल्लक होता.चासकमान धरणाची पाणी पातळी निम्यावर आल्यामुळे धरणा अंतर्गत असणाऱ्या गावांत पाणी टंचाई निर्माण होऊन पिके संकटात आल्यामुळे चासकमान धरणातील पाणी राखीव ठेवण्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत धरण प्रशासनाने त्वरित बैठक घेऊन धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले दुसरे आवर्तन बंद केले.चासकमान धरणा मधून खरिप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलै रोजी सोडण्यात होते. परंतु परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेड सह शिरूर तालुक्याच्या शेतकºयांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या मागणी नुसार सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेले खरिप हंगामाचे पहिल्या आवर्तनाची गरज पुर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसानंतर अथर्तत १२ आँक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता पहिले आवर्तन बंद करण्यात होते. परंतु शिरुर तालुक्यातील शोतक-यांच्या मागणीमुळे २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कालव्या द्वारे पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते. परंतु धरणाअंतर्गत पाणी टंचाई निर्माण होऊन भविष्यात दुष्काळी परिस्थिती होण्याचे चित्र असल्याने शुक्रवारी आवर्तन बंद करण्यात आले.रब्बी हंगामातील शेतक-यांच्या मागणी नुसार जोडून सुरु असलेल्या अवर्तनाचा शेतकºयांना मोठा फायदा झाला. या जोड आवर्तनामुळे मेथी, कोथीबीर,फ्लावर, कोबी, मिरची, आदी पिकांचे उत्पादन वाढले आहे. शिरुर व खेड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेता मध्ये खोदून तयार करण्यात आलेली शेततळी भरुण ठेवल्याने उन्हाळ्यात होणाºया पाणी टंचाईवर मात करता .येणार आहे. शिवाय, रब्बी हंगामाचे आवर्तन सूरु असल्याने चास, कमान, मोहकल,कान्हेवाडी, कडधे, आखरवाडी, तिन्हेवाडी, सांडभोरवाडी, रेटवडी, आदी गावासह शिरुर तालुक्यातील कालव्या अंतर्गत असलेल्या अनेक गांवांतील पाणी पुरवठा करणाºया योजनेचा फायदा झाला. त्यामुळे येथील शेतक-यांनी धरण प्रशासन व अधिका-यांचे धन्यवाद व्यक्त केले.धरण उशाशी कोरड घशाशीचासकमान धरणामधून रब्बी हंगामाचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे धरणामधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. त्यामुळे धरणाअंतर्गत असलेल्या शेतकºयांना आपल्या पिके जगविण्यासाठी तारेवरची कसरत करून पाणी द्यावे लागत आहे . गावातील नळ पाणीपुरवठा योजनादेखील दोन सलगच्या आवर्तनामुळे संकटात आले आहे. त्यामुळे धरणाजवळील गावांची अवस्था धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी झाली आहे....अशी झाली पाण्याची घटरब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते. तेव्हा चासकमान धरणामध्ये ८४.१४ पाणीसाठा शिल्लक होता, तर पाणीपातळी ६४७.५८ मीटर आणि एकूण पाणीसाठा २०७.७३ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा १८०.५४ दलघमी इतका होता. सध्या धरणा मध्ये ४४.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीपातळी ६४१.३२ मीटर आहे एकुण पाणीसाठा १२१.८४ दलघमी तर उपयुक्त साठा ९४.६५ दलघमी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी धरणामध्ये ४० टक्के साठा कमी शिल्लक आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी