शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची दाहकता वाढली : लाडक्या सर्जा-राजाला बाजारचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 00:16 IST

दुष्काळाची दाहकता वाढल्याने चारा-पाणीटंचाईचा प्रश्नही भीषण झाल्याने शेतकरीवर्ग लाडक्या सर्जा-राजाला बाजारचा रस्ता दाखवीत आहे.

बेल्हा  - दुष्काळाची दाहकता वाढल्याने चारा-पाणीटंचाईचा प्रश्नही भीषण झाल्याने शेतकरीवर्ग लाडक्या सर्जा-राजाला बाजारचा रस्ता दाखवीत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील बेल्हा (ता. जुन्नर) येथील प्रसिद्ध बैलांच्या आठवडेबाजारात असे चित्र पाहावयास मिळत असून बैलांची विक्रीस येण्याची संख्या रोडावली असून त्यांची खरेदीही रोडावली आहे. त्याची कवडीमोल भावाने विक्री करीत आहेत.येथील सोमवारचा आठवडे बैलबाजार जिल्ह्यात व इतर जिल्ह्यांत सर्वत्रच प्रसिद्ध आहे. या बाजारात शेतकरी व व्यापारी बैल खरेदी-विक्रीसाठी येतात. या बाजाराशिवाय या बाजारात म्हशींचा बाजार व शेळ्यामेंढ्यांचा बाजार मोठा भरतो. तसेच, तरकारी बाजारही मोठा भरतो. धरण त्यांचे कालवे व नद्यांच्या लाभक्षेत्रातील काही ठिकाणांसह इतर सर्व ठिकाणी सध्या दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. उष्णतेच्या तीव्र झळांनी मानवासह पशुपक्ष्यांनाही याची झळ बसत आहे.दुष्काळी स्थिती उद्भवल्यामुळे सध्या सगळीकडे चारा व पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग त्याच्याकडील जनावरांची बाजारात विक्री करत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून बैलांसह इतर जनावरांची विक्रीस येण्याची संख्या कमालीची कमी झाली आहे. हा बैलबाजार दोन तासांतच ओस पडत आहे. येथील बैलबाजारात गावठी बैलांच्या जोडीचा भाव ३० ते ३५ हजार होता, तर म्हैसुरी बैलजोडीचा भाव ३५ ते ४० हजार रुपये होता.म्हशींचा बाजारभावही नेहमीच्या तुलनेत कमी होत. मात्र, दुष्काळी स्थितीमुळे त्यांची खरेदी या कमी झालेल्या बाजारभावातही होत नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले. त्यातच शेतकरीवर्ग यांत्रिकीकरणाकडे वळालेला दिसून येत आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. त्याचा फटकाही या बैलबाजाराला बसत आहे. शेतमालाला भाव नाही, तसेच चाऱ्याचे भावही प्रचंड वाढलेले आहेत.सध्या जनावरांचा पाण्याचा प्रश्न व चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच, शेतमालाला भाव नाही.- सुधीर कोळेकर, भांडगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबादसध्या जनावरे संभाळणे अत्यंत अवघड झाले आहे. त्यामुळे जनावरे कवडीमोल भावाने विकण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिलेला नाही.- शंकर शेंडगे,बार्शी, जि. सोलापूर

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळ