शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाऊस पडून देखील दुष्काळजन्य परिस्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 19:50 IST

जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने आणि अनेक ठिकाणी पावसाचे सातत्य नसल्याने खरीपाची पिके संकटात सापडली आहेत.

ठळक मुद्देजुन्नर तालुक्यात सरासरीच्या १२७ टक्के पावसाची नोंद इंदापूर, दौंड, बारामती आणि शिरुर या चार तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक दुष्काळसदृश्य स्थिती जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा जिल्हा प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू

पुणे : जिल्ह्यातील मावळ, मुळशी खेड तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये पावसाच्या अभावामुळे शेतीबाबत परिस्थिती गंभीर आहे. मात्र, पाऊस पडूनही केवळ सातत्य नसल्याने जुन्नर, वेल्ह्यासह काही ठिकाणची भातासह इतर पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने आणि अनेक ठिकाणी पावसाचे सातत्य नसल्याने खरीपाची पिके संकटात सापडली आहेत. जिल्हयातील मावळ, मुळशी, खेड तालुके सोडून इतर दहा तालुक्यांमधील स्थिती गंभीर आहे. इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जुन्नर तालुक्यात सरासरीच्या १२७ टक्के पावसाची नोंद झाली. मात्र, पावसाचे सातत्य नसल्याने तेथील भात पीक वाया गेले आहे. त्यामुळे या तालुक्यातही शासनाची मदत पोहचवली जाणार आहे. वेल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. बुधवार अखेरीस (दि. २४) गुंजवणी धरणात ३ अब्ज घनफूट (८३ टक्के) पाणीसाठा आहे. मात्र, अखेरच्या टप्प्यात पाऊस झालाच नाही. परिणामी येथील पिके देखील संकटात सापडली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा आहे. या शिवाय ६० लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. हा चारा जानेवारीपर्यंत पुरू शकणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळजन्य दहा तालुक्यांपैकी इंदापूर, दौंड, बारामती आणि शिरुर या चार तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक दुष्काळसदृश्य स्थिती असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी दिली. आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हे या दहा तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे अहवालात नमूद केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊस