दौंड-बारामती रस्त्याची दुरवस्था

By Admin | Updated: July 16, 2014 04:20 IST2014-07-16T04:20:52+5:302014-07-16T04:20:52+5:30

दौंड-बारामती मार्गावर जिरेगाव, कुरकुंभ परिसरात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे

Drought-Baramati road disaster | दौंड-बारामती रस्त्याची दुरवस्था

दौंड-बारामती रस्त्याची दुरवस्था

कुरकुंभ : दौंड-बारामती मार्गावर जिरेगाव, कुरकुंभ परिसरात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी दुचाकीस्वारांना गंभीर इजा होत आहे.
या मार्गावरील वाहतुकीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या मार्गावर अवजड वाहतूक देखील होत आहे. नगरकडे जाणाऱ्या वाहनांचा मुख्य रस्ता हाच आहे. परिणामी या भागातील रस्त्यावर वाहनांची वर्दळ पाहावयास मिळते. अशातच रस्त्याची अवस्था चांगली नसल्यामुळे व त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. दुचाकीस्वारांना खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत.
या मार्गावरील रस्त्याची रुंदी अतिशय कमी आहे. दोन्ही बाजूला उंच कडा आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला जाण्यासाठी दुसऱ्या बाजूच्या चारचाकीला रस्त्याच्या खाली उतरावे लागते. अवजड वाहनाला तर हे काम अत्यंत जिकिरीचे होत आहे. अरुंद रस्त्यावरून वाहनांना खाली उतरवणे श्क्य होत नाही. परिणामी जागेवर थांबून दुसऱ्या गाडीस रस्त्याच्या खाली उतरावे लागते.
अवजड वाहनाला तर हे काम अत्यंत जिकिरीचे होत आहे. अरुंद रस्त्यावरून वाहनांना खाली उतरवणे शक्य होत नाही. परिणामी जागेवर थांबून दुसऱ्या गाडीस रस्त्याच्या खाली उतरून जावे लागते.
बारामती तालुक्याच्या हद्दीतील रस्त्याचे रुंदीकरण झालेले आढळते. मात्र, दौंड तालुक्याच्या हद्दीतील रस्ते अरुंद व खड्डेमय आहेत. या खड्ड्यांमध्ये माती टाकलेली आढळते. जिरेगाव येथील रस्ता अत्यंत धोकादायक आहे. येथील भोळोबावाडीस जाणाऱ्या मार्गाजवळ असणाऱ्या चढामुळे समोरील वाहन न दिसल्यामुळे बऱ्याच वेळा अपघात झालेले आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्याची रुंदी वाढवून यामधील खड्डे बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Drought-Baramati road disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.