शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हिंग स्कुल चालकांना मिळणार प्रशिक्षण; देशातील पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 11:28 IST

आरटीओ व सीआयआरटीचा पुढाकार

ठळक मुद्देरस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना पुण्यातील एकुण ६० स्कुलचे मालक किंवा एका प्रशिक्षकाला प्रशिक्षण

पुणे : वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाºया मोटार ड्रायव्हिंग स्कुलमधील चालकांनाच आता ‘ट्रेन द ट्रेनर’ या संकल्पनेअंतर्गत तंत्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक संस्था (सीआयआरटी) व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. मंगळवार (दि. ८) पासून या प्रशिक्षणाला सुरूवात झाली असून हा देशातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर ‘ट्रेन द ट्रेनर’ ही संकल्पना पुढे आली आहे. ‘सीआयआरटी’कडून  पाच दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशननेही याबाबतचा प्रस्ताव दिला होता. या अभ्यासक्रमाची सुरूवात मंगळवारपासून करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ८ ते १२ डिसेंबर आणि १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत प्रत्येकी ३० याप्रमाणे पुण्यातील एकुण ६० स्कुलचे मालक किंवा एका प्रशिक्षकाला प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असून पुढील टप्प्यात सर्वच ड्रायव्हिंग स्कुलसाठी हा अभ्यासक्रम बंधनकारक केला जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना, व्यक्तिमत्व विकास, रस्ते सुरक्षा, चांगला प्रशिक्षक कसा असावा याबाबतचे मार्गदर्शन केले जाईल.

अभ्यासक्रमाच्या उदघाटनप्रसंगी परिवहन आयुक्त कार्यालयाचे रस्ता सुरक्षा विभागातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव, पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे,  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, सीआयआरटीचे प्रशांत काकडे, ड्रायव्हिंग स्कुल संघटनेचे अध्यक्ष राजु घाटोळे आदी उपस्थित होते. पुण्यात सुमारे ४५० तर राज्यात सुमारे १७ हजार ५०० सरकारमान्य स्कुल असून या सर्वांना हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे घाटोळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसAccidentअपघात