शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालक झाले ‘आऊट आॅफ कंट्रोल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 01:15 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवित स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणारे वाहनचालक ‘आउट आॅफ कंट्रोल’ झाले आहेत.

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवित स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणारे वाहनचालक ‘आउट आॅफ कंट्रोल’ झाले आहेत. अशा वाहनचालकांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असली तरी त्यावर अंकुश ठेवता आलेला नाही. या भरधाव वेगापायी अनेकांना जीव गमवावा लागत असूनही बेशिस्त वाहनचालक ताळ्यावर येताना दिसत नाहीत.शहरात दोन दिवसांत झालेल्या दोन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी खराडी येथे भरधाव वेगात असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने आजी व नातवाचा बळी गेला. तर गुरुवारी रात्री सातारा रस्त्यावर दुचाकीवरून चाललेल्या दोघा मित्रांना अपघातात प्राण गमवावे लागले. या घटना शहर व परिसरात सातत्याने घडतात. एखाद्या ठिकाणी लवकर पोहचण्याची घाई, वाहन वेगात चालविण्याचे थ्रील, मद्यपान करून वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहन वेडेवाकडे चालविणे यांमुळे लहान-मोठे अपघात होतात. पोलिसांकडून असे प्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कारवाई केली जाते. पण, याकडे वाहनचालकांकडून सर्रासपणे दुर्लक्ष करतात.काही दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक वाहनचालकांना संयम नसल्याचे दिसून आले. सिग्नलवर उभे असलेले वाहनचालक पुढे जाण्यासाठी सातत्याने हॉर्न वाजवून समोरच्या वाहनचालकांनाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यास भाग पाडतात. अनेकदा सिग्नल तोडून वेगात पुढे जाणारे वाहनचालक शहरातील रस्त्यांवर नेहमी दिसतात. वर्दळीच्या रस्त्यांवर वेडीवाकडी वळणे घेत दुचाकी चालविणे तरुणही आहेत. तर रात्रीच्या वेळी रिकाम्या रस्त्यावर स्पोर्ट्स बाईकवरून वेगाने जाणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाºया वाहनचालकांचाही अनेकदा अपघात झाला आहे. पण त्यानंतरही अशा वाहनचालकांना धडा मिळालेला नाही. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच शहरांतील रस्त्यांवर रॅश ड्रायव्हिंग करणाºया बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पण त्यामुळे या वाहनचालकांसह इतर निष्पाप नागरिकांचाही बळी जात आहे. मद्यपान करून वाहन चालविणाºयांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाते. यावर्षी आॅगस्टअखेरपर्यंत ९ हजार १३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून शहरात अधूनमधून नाकाबंदी करून संबंधितांना पकडले जाते. पण त्यानंतरही मद्यपी वाहनचालक बिनदिक्कतपणे वाहन चालवत असतात.>रॅश ड्रायव्हिंगप्रकरणीपोलिसांनी केलेली कारवाईमहिना वाहनचालक दंड वसुलीजानेवारी ७१७ ७,१७,०००फेब्रुवारी २५२ २,५२,०००मार्च २९६ २,९६,०००एप्रिल ४११ ४,११,०००मे ५४५ ५,४५,०००जून ४१९ ४,१९,०००जुलै ४२५ ४,२५,०००आॅगस्ट ६७२ ६,७२,०००एकूण ३,७३७ ३७,३७,०००>तीन हजार वाहनचालकांवर कारवाईरॅश ड्रायव्हिंगप्रकरणी पोलिसांनी जानेवारी महिन्यापासून आॅगस्ट अखेरपर्यंत ३ हजार ७३७ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये त्यांच्याकडून ३७ लाख ३७ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. तसेच काहींवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आता बेशिस्त वाहनचालकांवर वचक ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.>वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून त्यांना शिक्षा होण्यासाठी या प्रकरणांचा तपास देखील जलद गतीने होत आहे. त्यामुळे आता नियमभंग केल्यानंतर दंड भरून वाहन चालकांची सुटका होईलच असे नाही. वाहतूक कायद्यांचे उल्लंघन करणाºया सुमारे ३०० चालकांचे पासपोर्ट थांबविण्यात आले आहेत. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे.-तेजस्वी सातपुते, उपायुक्त, वाहतूक शाखा