शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

...अन् थोडक्यात जीव वाचला! चायनीज मांज्याने वाहनचालकाचा चिरला गळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 21:57 IST

वाहनचालकाने गाडीला ब्रेक दाबल्यामुळे  तो थोडक्यात बचावला

ठळक मुद्देधायरी येथील उड्डाणपुलावरील घटना..

पुणे : सध्या चायनिज मांजावर बंदी असतानाही शहरात सर्रास त्याची विक्री होत आहे. हे मांजे मात्र दुचाकीचालकांच्या जीवावर बेतत आहेत. शुक्रवारी दुपारी धायरी येथील उड्डाणपुलावर एका मांज्यामुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेला. वाहनचालकाने गाडीला ब्रेक दाबल्यामुळे  तो थोडक्यात बचावला. परंतु, गळ्यावर मात्र चिर पडली. धायरी उड्डाणपुलावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नायलॉनचा मांजा कुठून तरी उडून या पुलावर आला होता. तो पुलावर अडकला होता. वाºयाने तो उडाला आणि दुचाकीस्वाराच्या समोरून गळ्याला अडकला. त्यामुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेला. गाडीचा वेग अधिक असता तर हा मांजा जीवावर बेतला असता. परंतु, थोडक्यात निभावले गेले. खरंतर गेल्या काही वर्षांपासून चायनीज मांज्यावर बंदी आहे. वन विभागाला असे मांजा दिसल्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यावर कोणीही कारवाई करीत नसल्याने सर्रास दुकानांवर हे मांजे विक्रीला आहेत. सध्या मकरसंक्रांत जवळ येत असून, पतंग उडविण्यासाठी मुले मांजे विकत घेत आहेत. त्यात चायनीज मांजा अत्यंत घातक असतो. त्याने गळा काही क्षणात चिरला जातो. तसेच हे मांजे पक्ष्यांच्याही जीवावर बेततात. अनेक पक्षीही आपला जीव या मांज्यामुळे गमावतात. नायलॉन मांज्याचा वापर करून अनेकजण पतंग उडवतात. पतंग उडविताना तो विद्यूत तारेपासून दूरच उडविला पाहिजे. अन्यथा तारेला चिकटून त्यातून विद्यूतप्रवाह उतरण्याचा धोका आहे. पतंग कटल्यानंतर तो इतरत्र उडत जातो. नायलॉन मांज्यामध्ये धातूच्या भुकटीचा वापर केलेला असतो. त्यामुळे धातूमुळे वीज प्रवाहाचा झटका बसण्याची शक्यता असते. तसेच एखाद्या दुचाकीस्वाराच्या समोर आला, तर त्याचा गळा चिरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा नायलॉनचा मांजा जीवावर बेतू शकतो. 

मी दुपारी दुचाकीवर शहरात येत होतो. तेव्हा धायरी पुलावर अचानक माझ्यासमोर नायलॉनचा मांजा गळ्यावर आला. तेव्हा मी ब्रेक दाबला. तोपर्यंत मांज्याने माझा गळा चिरलेला होता. लवकर थांबल्याने अधिक इजा झाली नाही.  -अजय वसाके, दुचाकीचालक 

चायनीज मांजाला कायद्याने पूर्णत: बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही त्यावर काहीच कारवाई होत नाही. आज प्रत्येक दुकानात हा मांजा विकला जातो. तो बंद करून, संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे. कारण या मांज्यामुळे पक्षी आणि नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. - संतोष थोरात, पक्षीप्रेमी आणि वाईल्ड एनिमल्स एन्ड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी  

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीkiteपतंग