पोलिसांच्या आशीर्वादाने चालकांची मुजोरी

By Admin | Updated: July 18, 2014 03:34 IST2014-07-18T03:34:10+5:302014-07-18T03:34:10+5:30

वाहतूक नियमाकडे डोळेझाक करीत बिनधास्तपणे रिक्षा चालविणे हा आपला अधिकार असल्याचा आविर्भावात चालक शहरात सर्वत्र दिसतात

Driven by the blessings of the police force | पोलिसांच्या आशीर्वादाने चालकांची मुजोरी

पोलिसांच्या आशीर्वादाने चालकांची मुजोरी

मिलिंद कांबळे, पिंपरी
वाहतूक नियमाकडे डोळेझाक करीत बिनधास्तपणे रिक्षा चालविणे हा आपला अधिकार असल्याचा आविर्भावात चालक शहरात सर्वत्र दिसतात. आपल्यासाठी कोणतेच नियम नाहीत, अशा आविर्भावात ते वाहन चालवितात. मात्र, रिक्षाला इतर वाहनांचा थोडासा जरी स्पर्श झाला, तर त्या चालकांच्या अंगावर धावून जातात. नियमाकडे दुर्लक्ष करीत बेधडक रिक्षा चालवून वाहन चालविण्याची वेगळीच क्रेझ दिसते. नियम मोडले तरी, वाहतूक पोलीस त्याच्याकडे कानाडोळा करतात. इतर वाहनचालकावर शिस्तीचा बडगा उगारणारे पोलीस रिक्षावाल्याना का पाठीशी घालतात, हे मोठे आश्चर्य आहे.
बॅच, परवाना, तसेच परमिट नसलेल्या अनेक रिक्षा बिनदिक्कतपणे शहरात धावतात. पोलीस मात्र, असा रिक्षांकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करतात. स्थानिक नेते व गुंडांची ही वाहने आहेत. पोलिसांनी अशा रिक्षा पकडल्या, तरी त्या आरटीओपर्यंत जात नाहीत.
तेथेच दंड करुन त्या सोडून दिल्या जातात. मात्र, सामान्य रिक्षाचालकावर कोर्ट, आरटीओ, वाहतूक पोलीस असा तिन्ही प्रकाराचा दंड आकारुन रिक्षा ८ ते १० दिवसांसाठी सस्पेंड केली जाते. कोर्टातून वाहन सोडविताना किमान १,८०० रु. दंड भरावा लागतो. वकिलाचे शुल्क असे दोन ते सव्वादोन हजार रुपये खर्च होतो. रिक्षा बंद असल्याने त्या दिवसांचा धंदा बुडतो. ही रकम भरण्यास पुन्हा सावकारी कर्जाच्या कचाट्यात तो सापडतो.
एखाद्या प्रवाशाने हात दाखविला की, भरधाव रिक्षा कोठेही थांबविली जाते. मागून येणाऱ्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होतो. नियंत्रण मिळविताना दुभाजकावर जाऊन वाहन धडकते. यावरुन वाद घातल्यास रिक्षाचालक त्या व्यक्तीलाच शिवीगाळ करतात.

Web Title: Driven by the blessings of the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.