शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

‘दृश्यम’स्टाईल मर्डर प्लॅन ; तब्बल दोन हजार सीसीटीव्हींच्या फुटेजवरून तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 20:28 IST

व्यावसायिक आनंद उनावणे हत्या प्रकरण; कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्याने कट रचून अपहरणानंतर केला खून 

ठळक मुद्दे३९ लाख ५ हजार ६७८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत

पिंपरी : फ्रेंडस फंड इंडिया प्रा. लि. चिटफंड कंपनीचे संचालक आनंद साहेबराव उनावणे (वय ४२, रा. मोरवाडी, पिंपरी) यांचे अपहरण करून खून करण्यात आला. याप्रकरणी चार मुख्य आरोपींसह सात आरोपींना अटक केली. पिंपरी-चिंचवडपोलिसांनी दोन हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी करून याप्रकरणाचा तपास केला. मयत उनावणे यांनी त्यांच्या कंपनीतून कामावरून काढलेल्या एका कर्मचाऱ्याने हा प्रकार केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंदी चित्रपट ‘दृष्यम’ स्टाईलने एक वर्षापासून कट रचून चार जणांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे.   

उमेश सुधीर मोरे (वय २८, रा. काळेवाडी), दीपक धर्मवीर चंडालिया (वय ३४, रा. रावेत), सागर दत्तात्रय पतंगे (वय २८, रा. कटफळ, ता. बारामती), बाबू उर्फ तुळशीराम नथुराम पोकळे अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. आरोपींनी खंडणीपोटी घेतलेले सोन्याचे दागिने कोणत्याही पावतीशिवाय खरेदी केल्याप्रकरणी राकेश राजकुमार हेमणानी (वय २७, रा. पिंपरी), कपिल ग्यानचंद हासवाणी (वय ३०, रा. पिंपळे सौदागर), प्रवीण नवनाथ सोनवणे (वय २२, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रभू पुजारी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत विष्णू साहेबराव उनावणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रभू पुजारी हा उनावणे यांच्या चिटफंड कंपनीत काम करत होता. त्याच्या वर्तणुकीवरून उनावणे यांनी त्याला वर्षभरापूर्वी कामावरून काढले. त्याचा राग धरून त्याने उनावणे यांना मारण्याचा तसेच त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्याने अन्य चार आरोपींना विश्वासात घेऊन एक वर्षापासून कट रचला. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री उनावणे यांच्या राहत्या घरापासून आरोपींनी चारचाकी वाहनातून अपहरण केले. त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर आरोपींनी उनावणे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. महाड येथे दगडाने ठेचून मृतदेह सावित्री नदीपात्रात फेकून दिला. उनावणे यांचा मृतदेह ६ फेब्रुवारी रोजी नदीपात्रात आढळला. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम, दागिने असा एकूण ३९ लाख ५ हजार ६७८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.    

यापूर्वीही चारचाकीतून केले होते अपहरणआरोपी उमेश, दीपक, सागर आणि बाबू या आरोपींनी ऑक्टोबर महिन्यात एक अपहरण आणि खंडणीचा गुन्हा केला होता. त्या गुन्ह्यात ते आरोपी बाहेर आले. त्यानंतर मुख्य आरोपी प्रभू पुजारी याने त्यांना गुन्ह्यात समाविष्ट करून घेतले. दरम्यान ऑक्टोबर महिन्यातील गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनाचा वापर उनावणे प्रकरणात करण्यात आला. ही चारचाकी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली. त्यावरून पोलिसांनी तपास केला.

सीसीटीव्ही फुटेजवरून जाेडली गेली लिंकगुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी पिंपरी, मोरवाडी, फिनोलेक्स चौक, पिंपरी गाव, काळेवाडी, रहाटणी, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी या परिसरातील दोन हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. त्यातून लिंक तयार करून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. 

‘दृश्यम’प्रमाणे रचला कट ‘दृश्यम’ या हिंदी चित्रपटाच्या कथानकानुसार आरोपींनी अपहरण करून खून करण्याचा कट रचला. स्वत:चा फोन न बाळगता अपहृत उनावणे यांच्या मोबाईलचा आरोपींनी वापर केला. त्या फोनवरूनही प्रत्यक्ष न बोलता संपर्कासाठी मेसेज केले. काम झाल्यानंतर उनावणे यांचा मोबाईल फोन कर्नाटककडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये फेकून दिला. त्यातून दिशाभूल झाल्याने पोलीस तपासासाठी सोलापूरपर्यंत गेले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखूनPoliceपोलिसcinemaसिनेमा