Drinking woman hits the car in society Pune: Video goes viral on social media | Video: पुण्यात दारू पिऊन महिलेचा धिंगाणा; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 
Video: पुण्यात दारू पिऊन महिलेचा धिंगाणा; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

पुणे : पुण्यात बावधन भागात दारू पिऊन महिलेने धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या आधी संबंधित महिलेने स्वतःच्या चारचाकीने सोसायटीमध्ये पार्क केलेल्या इतर गाड्यांना धडक देत दहशत माजवण्याचा पण प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर तिला थांबवण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या अंगावरही तिने कार घालण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनाही महिलेच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी महिलेने अत्यंत अर्वाच्य भाषेचे वापर केला.  

स्वाती सौरभ मिश्रा असे या महिलेचे नाव असून तिच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्श सुभाष चावला यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी पहाटे स्वाती या त्यांच्या डस्टर या कारमधून घरी आल्या. त्यावेळी त्यांच्या कारचा सोसायटीच्या गेटजवळ असणाऱ्या नॅनोला धक्का लागला. त्यावरून त्यांनी स्वतःच रागात घेऊन नॅनोला वारंवार धडका दिल्या.  इतकेच नव्हे तर संतापाच्या भरात त्यांनी इतर गाड्यांनाही धडका दिल्या. त्यानंतर घाबरलेल्या रहिवाश्यांनी पोलिसांना फोन केला मात्र त्यांनीही महिलेच्या अवतारापुढे हात टेकले. अखेर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Drinking woman hits the car in society Pune: Video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.