शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

दारू पिऊन सतत त्रास देतो; दोघांनी केला एकाचा खून, खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 12:41 IST

नशेत असताना अजून दारूचे आमिष दाखवून त्या व्यक्तीला ओढ्याजवळील शेतात गळा आवळून मारले

चाकण: मागील सहा महिन्यांपासून दारू पिऊन वेळोवेळी केलेल्या मारहाणीच्या रागातून लाकडी दांडक्याने आणि गळा आवळून एकास जीवे ठार मारल्याची घटना रासे (ता.खेड ) गावच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संदीप उर्फ बाळशीराम शिवाजी खंडे (वय.४० वर्षे,रा.ठाकर वस्ती,रासे) असे खून करण्यात आल्याचे नाव आहे. सुरेश ज्ञानेश्वर मेंगाळ (वय.३६ वर्षे,रा.ठाकर वस्ती,रासे ) आणि दिलीप ऊर्फ टपाल अघान (नाव,पत्ता माहिती नाही) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून चाकण पोलीसांनी एकास आणि गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एक आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पवार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यांपासून सुरेश याचा दूरचा मामा संदीप हा छोट्या मोठ्या कारणावरून लोकांसमोर वाकडे तिकडे बोलून मारहाण शिवीगाळ करायचा. त्यामुळे त्याचा राग अनावर झाल्याने संदीपला कायमचे संपवण्याच्या उद्देशाने (दि.१८ ) ला तो दारूच्या नशेत असल्याने त्यास जास्तच्या दारूचे आमिष दाखवले. रासे गावच्या हद्दीतील मुंगसेवस्ती ओढ्याजवळील शेतात निर्जनस्थळी झोपवले. दारू आणण्यासाठी जातो असे सांगत सुरेश याने जवळचा मित्र दिलीप ऊर्फ टपाल अघान याला सोबतीला घेतले. संदीप झोपलेल्या ठिकाणी येऊन, टपाल याने जवळ असलेल्या लाकडी दांडक्याने संदिप ऊर्फ बाळशीराम याचे तोंडावर लागडी दांडक्याने जोर जोरात मारहाण केली. त्यानंतर सुरेश याने हाताने त्याचा जिव जाईपर्यंत गळा आवळाल्यावर संदीपची पुर्ण हालचाल थांबल्यानंतर त्याला बाजुचे झुडपात ढकलुन दिले. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडChakanचाकणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक