शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नाटकांमुळे संवेदनशीलता वाढते : संपदा जोगळेकर; बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाचा पुण्यात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:41 PM

रंगमंचावर मुले संवेदनशीलतेचे श्वास घ्यायला शिकतात. मुले हळूहळू पुढे जातील. त्यांना सारखे धावायला लावू नका. त्यांच्या मानगुटीवर बसून त्यांचं जगणं थांबवू नका, असे अभिनेत्री व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी सांगितले.

ठळक मुद्दे ‘न वितळणारा हमकण’ व ‘खमंग दुपार’ ही नाटके झाली सादर २५ वर्षे बालरंजनच्या नाटकांचे रंगभूषाकार असलेल्या प्रभाकर भावे यांचा झाला सत्कार

पुणे : नाटक हे एक संस्काराचे माध्यम आहे. नाटक आपल्याला संवेदनशील बनविते... इथे रंगमंचावर मुले संवेदनशीलतेचे श्वास घ्यायला शिकतात. मुले हळूहळू पुढे जातील. त्यांना सारखे धावायला लावू नका. त्यांच्या मानगुटीवर बसून त्यांचं जगणं थांबवू नका, असे अभिनेत्री व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी सांगितले. बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाच्या समारोपाप्रसंगी त्या पालकांशी बोलत होत्या.या वेळी ‘न वितळणारा हमकण’ व ‘खमंग दुपार’ ही नाटकेही सादर झाली.  देवेंद्र व रेणुका भिडे यांनी या वर्षी नाट्यवर्गाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. प्रज्ञा गोवईकर, दीप्ती कौलगुड व किशोरी कुलकर्णी यांनी साप्ताहिक सहामाही नाट्यवर्गाचे व्यवस्थापन सांभाळले. या वेळी डॉ. नीलिमा गुंडी, विदुला कुडेकर, शशिकला चव्हाण, अलका जोशी, रेवती थिटे उपस्थित होत्या. गेली २५ वर्षे बालरंजनच्या नाटकांचे रंगभूषाकार असलेल्या प्रभाकर भावे यांचा सत्कार करण्यात आला. घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमात,‘टीम श्यामची आई’चे संपदा जोगळेकर यांनी कौतुक केले.  साने गुरुजींची आई हा विषय आजच्या काळात निवडण्याचे धाडस केल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले. साने गुरुजींची आई यशोदा साने यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने हा विषय निवडल्याचे बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे