शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

डॉ. प्रकाश आमटे यांच्या तब्येतीत सुधारणा, सर्व टेस्टनंतर होणार कर्करोगावर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 12:31 IST

पुढील महिनाभर होणार उपचार

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Amte) हे सध्या पुण्यातील दिनानाथ मंंगेशकर रुग्णालयात न्युमोनियावर उपचार घेत आहेत. सध्या त्यांची तब्येत बरी आहे. आज कदाचित डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. पुढील दोन तीन दिवसांनी रुग्णालयात चेक होईल. त्यानंतर सर्व टेस्ट करून किमो थेरपी करण्यात येईल अशी माहिती डॉ. आमटेंचा मुलगा अनिकेत आमटे यांनी दिली आहे.

नंतर साधारण महिनाभर पुण्यातील रुग्णालयातच ट्रीटमेंट होणार आहे. डॉ. प्रकाश आमटे यांना रक्ताच्या कर्करोगाचे ( हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सर) निदान झाले आहे. सध्या ते न्युमोनियातून सावरत असून कर्करोगावरील उपचार लवकरच सुरू होतील असं त्यांचा मुलगा अनिकेत यांनी सांगितले.

डॉ. प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.

डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे.

टॅग्स :PuneपुणेDr Prakash Baba Amteडॉ. प्रकाश बाबा आमटे