डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:11 IST2020-12-06T04:11:11+5:302020-12-06T04:11:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने ...

Dr. Police arrangements on the occasion of Ambedkar Mahaparinirvana Day | डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस बंदोबस्त

डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर उद्यानात येत असतात. महात्मा गांधी रस्त्यावरील डॉ. आंबेडकर पुतळ्याला अभिवादनासाठीही नागरिकांची गर्दी होत असते. या दोन्ही ठिकाणी शहर पोलीस दलाने मोठा बंदोबस्त लावला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी न करता घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या आदल्या संध्याकाळी महापालिकेने संपूर्ण उद्यानात साफसफाई करुन परिसर धुवून काढला. शहरातील विविध बुद्ध विहारातही डॉ. आंबेडकर अभिवादनासाठी नागरिक जमतात. या ठिकाणीही स्थानिक पोलिसांना बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादनासाठी येणाऱ्यांनी शारिरीक अंतर राखून अभिवादन करावे. गर्दी करु नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांना व्यवस्थित दर्शनासाठी जाता यावे, यासाठी बॅरिकेट लावण्यात येत आहेत. गर्दी झाल्यास येथील वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहने दूर ठेवण्यास सांगितल्याचे बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी म्हणाले.

Web Title: Dr. Police arrangements on the occasion of Ambedkar Mahaparinirvana Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.