डॉ. सूर्यकांत देवकर महापालिकेचे नवे लसीकरण अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:10 IST2021-04-14T04:10:01+5:302021-04-14T04:10:01+5:30

पुणे : लस उपलब्ध करून देण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमित शहा यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ...

Dr. New Vaccination Officer of Suryakant Deokar Municipal Corporation | डॉ. सूर्यकांत देवकर महापालिकेचे नवे लसीकरण अधिकारी

डॉ. सूर्यकांत देवकर महापालिकेचे नवे लसीकरण अधिकारी

पुणे : लस उपलब्ध करून देण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमित शहा यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी रात्री तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी आता आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांची लसीकरण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यानुसार डॉ. देवकर यांच्याकडे आता एनयूएचएम नोडल अधिकारी, गाडीखाना एड्स विभाग यासह लसीकरण अधिकारी ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर डॉ. शहा यांच्याकडे बिबवेवाडी येथील ईएसआयसी हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, डॉ. देवकर यांच्याकडील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम यापुढे डॉ. अरविंद मखर यांच्याकडे देण्यात आले आहे.

Web Title: Dr. New Vaccination Officer of Suryakant Deokar Municipal Corporation