शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. माधव गाडगीळ यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ सन्मान; आयुष्यभर प्रामाणिकपणे पर्यावरणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल गौरव

By श्रीकिशन काळे | Updated: December 10, 2024 19:16 IST

जगभरात या पुरस्काराला अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पुरस्कार लाइफटाइम ॲचिव्हमेंट कॅटेगरीमध्ये दिला जातो.

पुणे : आयुष्यभर अतिशय प्रामाणिकपणे पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोच्च पुरस्कार ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ-२०२४’ मंगळवारी (दि.१०) जाहीर झाला. जगभरात या पुरस्काराला अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पुरस्कार लाइफटाइम ॲचिव्हमेंट कॅटेगरीमध्ये दिला जातो.

डॉ. गाडगीळ यांना यापूर्वी पद्मश्री आणि पद्मभूषण हे भारताचे मानाचे पुरस्कार मिळाले असून, जगातील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी देखील ते कार्यरत आहेत. त्यांचा पश्चिम घाटात अनेक वर्षे संशोधन करून एक अहवाल तयार केला होता. त्या संशोधनावर एक पुस्तक देखील प्रसिध्द झाले आहे. पश्चिम घाटातील पर्यावरणाचा प्रकल्पांमुळे होणारा ऱ्हास त्यांनी या अहवालात मांडला आहे.डॉ. गाडगीळ यांनी आतापर्यंत ७ पुस्तके लिहिली असून, २२५ वैज्ञानिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहेत.ते १९८० च्या दशकापासून पश्चिम घाट संवर्धनासाठी झटत आहेत. त्यासाठी सरकारने समिती गठित केली होती. त्यात गाडगीळ स्वत: प्रमुख होते. त्यांनी स्थानिक लोकांमध्ये जाऊन संशोधन करून जे योग्य आहे, तो अहवाल सादर केला होता. परंतु, त्यांचा अहवाल सरकारने स्वीकारला नाही. पश्चिम घाटात प्रचंड खाणी, रस्ते तयार केले जात आहेत. त्यामुळे या सह्याद्रीचे नुकसान होत आहे. त्याविषयीचा आवाज गाडगीळ सातत्याने उठवत आहेत. 

मला समाधान आहे की, मी एक शास्त्रज्ञ असून, लोकांसमवेत काम केले. अन्यथा इतर शास्त्रज्ञ असे काम करत नाहीत. ते राजकारणी लोकांच्या दबावाखाली वस्तूनिष्ठ व स्पष्ट असे काम करायला घाबरतात. परंतु, मी गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करतोय. त्यामुळे मी समाधानी आहे आणि हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला. - डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडenvironmentपर्यावरण