शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध यांच्यावरील काव्यात्मक अभिव्यक्तीचा परामर्श घेणारा ' 'बोधी शतक'  प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 21:00 IST

1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प

ठळक मुद्दे विचारांचा आशय समजून घेत अशा शंभर कवींची प्रकल्पासाठी  निवड

नम्रता फडणीसपुणे: ' मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून जन्मालो आलो. पण हिंदू म्हणून मरणार नाही, हे उदगार आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. धर्मांतराच्या  भीमगर्जनेनंतर 1956 मध्ये बाबासाहेबांनी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्मांतराचा साहित्य विश्वावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला. बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांच्याविषयी अनेक कवी विविध अंगांनी शब्दबद्ध झाले..या विषयावरील 1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प बोधी नाट्य परिषदेने हाती घेतला आहे.' बोधी शतक' या नावाने आकाराला येत असलेला हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरणार आहे.   भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांना ख्रिश्चन, मुस्लिम, शीख धर्माच्या धर्मगुरूंकडून आपल्या धर्मात येण्यासंबंधी विनंती करण्यात आली. मात्र बाबासाहेबांनी जातीभेद न मानणाऱ्या, सर्वांना समान समजणा-या, मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या आणि तळागाळातल्या लोकांच्या प्रती करुणा बाळगणाऱ्या बौद्ध  धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या धर्मांतरानंतर सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा अनेक स्तरावर  परिवर्तन घडले. गेल्या 64 वर्षात कविता कशी बदलत गेली.  याबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहण्याचा कवींचा  दृष्टीकोन कसा होता? म्हणजे श्रद्धा,   देवत्वच्या भावनेने  की तळागाळातल्या लोकांचे प्रश्न मांडणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे  पाहिले गेले याचा शोध घेण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर,  बुद्ध आणि बौद्ध धर्म यांच्या विचारांच्या  काव्यात्मक अभिव्यक्तीचा धांडोळा या प्रकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याची माहिती  प्रकल्प समन्वयक आणि  नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी ' लोकमत' शी बोलताना दिली.   ते म्हणाले, या प्रकल्पात 1956 ते 2019 पर्यंत डॉ आंबेडकर यांच्याविषयीच्या कवितांचा परामर्श घेण्यात आला आहे. विशिष्ट जाती, पंथ, धर्माच्या पलीकडे जाऊन कवितांचा शोध घ्यायचा होता. त्यामुळे बा.सी मर्ढेकर, राजानंद गडपायले, सुरेश भट, यशवन्त मनोहर, कवी ग्रेस यांपासून ते नंतरच्या काळातील  रवींद्र लाखे, मीनाक्षी पाटील, नीरजा, आशालता कांबळे, चेतन पिंपळापुरे अशा अनेक कवींच्या कवितांचा समावेश यात करण्यात आला आहे. कवी ग्रेस यांच्यासारख्या अनेक कवींच्या कविता थेट विषयाला भिडणाऱ्या नसल्या तरी त्यांच्या विचारांचा आशय समजून घेत अशा शंभर कवींची प्रकल्पासाठी  निवड करण्यात आली आहे. निवडीचे काम पूर्ण झाले असून, प्रस्तावना लिहिण्याचे काम सुरू आहे. एका कवितेबद्दल दोन विभिन्न प्रकारचे दृष्टीकोन असू शकतात..म्हणून दोन प्रस्तावना देण्यात येणार आहेत. टाळेबंदी हटल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होईल.

टॅग्स :PuneपुणेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्य