शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 20:33 IST

नॅकचे जनक, युजेसीचे माजी अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांसारखी पदे त्यांनी भूषविली.

पुणे : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांनी देशाच्या उच्च शिक्षणाला दिशा दिली आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम यांनी निगवेकर यांचा उल्लेख ' फादर ऑफ क्वलिटी एज्युकेशन इन इंडिया ' असा केला होता. 

गेल्या काही महिन्यांपासून निगवेकर आजारी होते.सात वर्षापूर्वी त्यांना ब्रेन कॅन्सर झाला होता.सुमारे वर्षभरापासून ते घरीच होते.शुक्रवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास हृदय बंद पडल्याने राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 

डॉ.निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी २०००-२००५ या कालावधीत सांभाळली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू म्हणून त्यांनी १९९८ ते २००० काम पाहिले. देशातील विद्यापीठ, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल ॲसेसमेंट ॲण्ड ॲक्रेडिटेशन कन्सिलचे ते संस्थापक -संचालक होते.  पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख व मटेरियल सायन्सचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. तसेच पुण्यात सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज फिजिक्सची स्थापना केले. यूनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि कॅनडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टन ऑंटॅरिओ आदी ठिकाणी त्यांनी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम पाहिले.निगवेकर यांना विविध नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

विद्यापीठ कायद्यातील बदलासाठी राज्य शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. एक उत्तम शिक्षक प्रशासक आणि शिक्षण तज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्याच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.---------निगवेकर यांनी ग्रामीण भागातून येऊन स्वतःच्या कर्तृत्वावर आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर देशातील नामांकित संस्थांमध्ये प्रमुख पदावर काम केले. विद्यार्थी प्रिय शिक्षक, अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.  -  डॉ.शां.ब.मुजुमदार, संस्थापक -अध्यक्ष, सिंबायोसिस-----नॅकच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण गोष्टी केल्या. यूजीसीमध्ये आपल्या कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्रातून उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक व्यक्ती पुढे आल्या त्यात निगवेकरांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात कामगिरी करणारा एक मोठा शिक्षणतज्ञ आणि आमचा सहकारी हरपला आहे. डॉ.राम ताकवले, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ--------डॉ.अरुण निगवेकर हे उत्कृष्ट शिक्षक, उत्तम शैक्षणिक प्रशासक होते. नॅकचे जनक, यूजीसीचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आशा विविध शैक्षणिक संस्थानवर त्यांनी काम केले. देशाला त्यांचे शैक्षणिक योगदान विसरता येणार नाही.- डॉ.अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ------विद्यार्थीप्रिय शिक्षक, उत्तम प्रशासक, भविष्याचा वेध घेणारे शैक्षणिक नेतृत्व म्हणून डॉ. निगवेकर यांची कारकीर्द स्मरणात राहील. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम आणि विद्यमान कुलपती डॉ. शिवाजीराव कदम सर यांच्यासह भारती विद्यापीठ परिवाराशी डॉ. निगवेकर यांचे अतिशय सौहार्दपूर्ण संबंध होते.- डॉ. विश्वजीत कदम,प्र-कुलगुरू, भारती विद्यापीठ----------

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणPune universityपुणे विद्यापीठDeathमृत्यू