शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

दाऱ्या  घाट मार्गाचा डीपीआर पूर्ण : जुन्नरहून मुंबईला जाणारा सर्वात जवळचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 13:18 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ७२ वर्षांपासूनची मागणी असणाऱ्या दाऱ्या घाटाच्या मागणीबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे.

ठळक मुद्दे७२ वर्षांपासूनची मागणी; ड्रोनद्वारे सर्वेक्षण

जुन्नर : जुन्नरहूनमुंबईला जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरणाऱ्या दाऱ्या घाटाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार  करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी शेवटच्या टप्प्यात दाऱ्या घाटाच्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मोनार्च सर्व्हेअर्स अँड इंजिनिअर्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला १ कोटी ५८ लाख रुपयांचे काम दिलेले होते. दाऱ्या घाटाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाल्याने त्यानिमित्ताने जुन्नरकर नागरिकांची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ७२ वर्षांपासूनची मागणी असणाऱ्या दाऱ्या घाटाच्या मागणीबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे. घाटमाथ्यावरील आंबोली, घाटघर, तर घाटाखाली पळू, सिंगापूर तसेच इतर ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. येथे हे सर्वेक्षण करण्यासाठी मोनार्च कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राघोबा महाले, पंकज सोमवंशी व सहकारी यांनी जीपीएस प्रणाली व ड्रोनने वापर करून हे सर्वेक्षण केले. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील जमिनीचा उंचसखलपणा, मातीपरीक्षण, पाषाणाचे स्वरूप अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यात आल्यावर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याचा अहवाल देण्यात येईल, असे महाले यांनी सांगितले.  

*जुन्नरकर नागरिकांचे स्वप्न असणारा दाºया घाट व्हावा, यासाठी आता जुन्नर तालुक्यातील नागरिकांची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची तिसरी पिढी शासनाकडे पाठपुरावा करीत आहे.

*आता आमदार शरद सोनवणे, ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे आमदार किसन कथोरे, शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे कार्यवाह रवींद्र काजळे तसेच सर्वपक्षीय मंडळी, सामाजिक संस्था विविध माध्यमांतून दाºया घाटासाठी पाठपुरावा करीत आहेत.

* विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी या अहवालावर शासनाची मंजुरीची मोहर उमटवून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीची तरतूद करावी, अशी जुन्नर तालुक्यातील जनतेची मागणी आहे.  .........दाऱ्या घाटासाठी दिवंगत गणपत बोडके, भाऊसो निरगुडकर तसेच इतर मंडळींनी ब्रिटिशकाळात १९४५च्या दरम्यान नाणे घाट, दाऱ्या घाट व्हर्नाकुलर कंपनी स्थापन करून भागभांडवल गोळा केले होते.

*जुन्या पिढीतील कवी दिवंगत नारायण मते, विठ्ठल रासणे, बन्याबापू जोशी, हरिभाऊ शुक्ल यांनी हयातभर दाऱ्या घाटासाठी पाठपुरावा केला होता. 

टॅग्स :Junnarजुन्नरMumbaiमुंबईhighwayमहामार्ग