महिनाभर दांडी, तरी ‘फुलपगारी’

By Admin | Updated: March 20, 2015 00:57 IST2015-03-20T00:57:24+5:302015-03-20T00:57:24+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या डेपोमधील बसच्या सुरक्षेसाठी खासगी रखवालदारांची नेमणूक केली आहे.

Dough for a month, though 'flowerpages' | महिनाभर दांडी, तरी ‘फुलपगारी’

महिनाभर दांडी, तरी ‘फुलपगारी’

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या डेपोमधील बसच्या सुरक्षेसाठी खासगी रखवालदारांची नेमणूक केली आहे. परंतु, त्यांचे रखवालदार महिनोन्महिने गैरहजर राहून पूर्ण पगार घेत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीकर परदेशी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, ते आता काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
मार्केड यार्ड डेपोतून नुकतीच एक बस चोरीला गेल्याचा प्रकार उजेडात आला. त्यामुळे बस डेपोच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच खासगी रखवालदारांचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. राजीव युवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष हृषीकेश बालगुडे यांना मिळालेल्या माहितीतून हा प्रकार समोर आला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये १० बस डेपो आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी बस उभ्या केल्या जातात. बस लावण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने डेपोच्या परिसरात ररस्त्यांवरच बस लावल्या जातात. या बसच्या सुरक्षिततेसाठी रखवालदार पुरविण्याचा ठेका रक्षक ग्रुपला देण्यात आला आहे. करारानुसार रक्षक ग्रुपला ८ ते ९ लाख रुपये पीएमपी प्रशासनाकडून दिले जातात.
रक्षक ग्रुपचे रखवालदार बहुतांश वेळा कामावर हजर राहात नाहीत. ते पूर्ण महिनाभर गैरहजर असल्याची नोंद पीएमपीकडील हजेरी पुस्तकामध्ये असतानाही त्यांचे संपूर्ण वेतन अदा करण्यात आल्याची कागदपत्रे बालगुडे यांनी श्रीकर परदेशी यांच्याकडे सादर केली आहेत. उदारणादाखल त्यांनी गौतम साळवे या रखवालदाराचे हजेरी पुस्तक व त्याला पगार अदा केल्याचे पुरावे सादर केले आहेत.
पीएमपी गाडी रुळावर आणण्यासाठी परदेशी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असताना, त्यांनी या प्रकाराचाही बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

पीएमपीच्या रखवालदार पुरविण्यातील भ्रष्टाचारात सुरक्षा विभाग, आॅडिट विभाग व अन्य विभागातील अधिकारी सहभागी आहेत. त्यांच्या संगनमताशिवाय हा गैरव्यवहार करता येणे शक्य नाही. त्यामुळे संबंधितांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी बालगुडे यांनी केली आहे.

Web Title: Dough for a month, though 'flowerpages'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.