आंबिया बहारातही संशयास्पद विमा नोंदणी; पडताळणी सुरू, केळी पिकासाठी अर्जांची संख्या १९ हजारांनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 09:54 IST2024-12-01T09:54:30+5:302024-12-01T09:54:53+5:30

जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी ५५,२३६ अर्ज आले होते. गेल्या वर्षीच्या आंबिया बहारासाठी राज्यात ८३७ कोटींची भरपाई देण्यात आली. त्यात एकट्या जळगाव जिल्ह्यातील ५३,२६१ शेतकऱ्यांना ३२७ कोटींची भरपाई मिळाली.

Doubtful insurance registration even in Ambia Bahar; Verification started, number of applications for banana crop increased by 19 thousand | आंबिया बहारातही संशयास्पद विमा नोंदणी; पडताळणी सुरू, केळी पिकासाठी अर्जांची संख्या १९ हजारांनी वाढली

आंबिया बहारातही संशयास्पद विमा नोंदणी; पडताळणी सुरू, केळी पिकासाठी अर्जांची संख्या १९ हजारांनी वाढली

नितीन चौधरी

पुणे : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ लाखांहून अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत केळी पिकासाठी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण तब्बल १९ हजार ५००ने जास्त आहे. ही वाढ संशयास्पद असल्याने अशा अर्जदारांची क्षेत्रीय पडताळणी सुरू केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी ५५,२३६ अर्ज आले होते. गेल्या वर्षीच्या आंबिया बहारासाठी राज्यात ८३७ कोटींची भरपाई देण्यात आली. त्यात एकट्या जळगाव जिल्ह्यातील ५३,२६१ शेतकऱ्यांना ३२७ कोटींची भरपाई मिळाली. 

- विनयकुमार आवटे, कृषी संचालक.

आंबा पिकासाठी ३१ डिसेंबरअखेर विमा काढता येणार

राज्यात आंबिया बहाराच्या हंगामासाठी द्राक्ष, स्ट्रॉबेरी, केळी, मोसंबी, आंबा, काजू, संत्रा, पपई व डाळिंब या पिकांसाठी विमा अर्ज दाखल करण्यात येत आहेत. कोकणातील आंबा, काजू व अन्य जिल्ह्यांतील संत्रा पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर असून, कोकणाव्यतिरिक्त उर्वरित राज्यातील आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर, तसेच डाळिंब पिकासाठी १४ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. उर्वरित पिकांसाठी विमा काढण्यासाठीचा कालावधी संपला आहे.

कृषी विभागाकडे आतापर्यंत आलेले अर्ज

गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्जांची संख्या १९,४९९ एवढी जास्त आहे.

 

Web Title: Doubtful insurance registration even in Ambia Bahar; Verification started, number of applications for banana crop increased by 19 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.