शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पुणे महापालिकेच्यावतीने तब्बल तीन लाख बालकांना  ‘पोलिओ’चा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 8:33 PM

सर्व बालकांना या लसीचे दोन थेंब देऊन मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन

ठळक मुद्देएकूण चौदाशे बूथ, साडेचार हजार कर्मचारी सज्ज

पुणे : राष्ट्रीय पल्स मोहिमेंतर्गत रविवारी (दि. १९) रोजी ० ते ५ या वयोगटातील तब्बल तीन लाख बालकांना  ‘पोलिओ’ची लस दिली जाणार आहे. सर्व बालकांना या लसीचे दोन थेंब देऊन मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.महापालिकेच्यावतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम-२०२० साठी तयारी केली आहे. या मोहिमेद्वारे ० ते ५ वर्ष या वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस देणे बंधनकारक आहे. या मोहिमेची आढावा बैठक बुधवारी घेण्यात आली. या बैठकीमध्ये आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, लसीकरण अधिकारी डॉ. अमित शहा, समन्वय अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर, यांच्यासह बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षक उपस्थित होते. पालिका हद्दीतील वीटभट्टया, स्थलांतरीत वस्त्या, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे अशा जोखमीच्या भागातील बालकांना लस देण्याकरिता विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच रेल्वेस्थानक, बस स्थानक, उद्याने, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बुथ कार्यरत राहणार आहेत. ‘‘या मोहिमेंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,’’ असे आवाहन आयुक्त सौरव राव यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका