पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या लाभार्थ्यांना आता सरकारकडून स्वतःहून ‘लाभ’ सोडण्यासाठी आवाहन केले गेले होते. इतर योजनेचा लाभ घेत याही योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांवर कारवाईचा इशाराही दिला होता.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील एका लाभार्थ्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, म्हणून अर्ज दिला आहे. विशेष म्हणजे, संबंधित लाभार्थी या जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्ती कर्मचारी आहेत. काही दिवसांपूर्वी, महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनूप कुमार यादव यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये इतर योजनांचा लाभ घेणारे व ज्यांना लाडकी बहिणीच्या योजनेची गरज नाही, अशा लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्याला लॉगिन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.जिल्ह्यात २१ लाख ११ हजार ९९१ बहिणींनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी २० लाख ८९ हजार ९४६ महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र, आता सरकारने अपात्र लाभार्थ्यांना स्वतःहून ‘लाभ’ सोडण्यासाठी आवाहन करत कारवाईचा इशारा दिल्याने शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे एका लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्याबाबतचा अर्ज आला आहे. संबंधित लाभार्थी या जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना पेन्शनचा लाभ मिळत आहे. त्यांनी दिलेल्या अर्जामध्ये इथून पुढे मला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, असे नमूद केले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांनी तत्काळ स्वतःहून ‘लाभ’ सोडण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.
दिले जाणार असून, जी ‘बहीण’ स्वतःहून योजना नाकारेल, त्यांचा अर्ज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिनहून जिल्हापातळीवर संबंधित महिलेचे नाव वगळण्यात यावे, अशा सूचना सोमवारी (ता.१३) घेतलेल्या बैठकीत राज्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिली.