शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका', अजितदादांची मास्क न घालणाऱ्यांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 15:08 IST

पुण्यात आज ३१ ठिकाणच्या कार्यक्रमांना अजित पवार भेटी देणार

पुणे : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध कामांचे उदघाटन होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३१ ठिकाणच्या कार्यक्रमांना अजित पवार भेटी देणार आहेत. यावेळी कात्रज येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मास्क घालण्याची विनंती अजित पवार यांनी केली आहे. बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका, चीनमध्ये अजूनही हा वेगाने पसरत असल्याचं ते यावेळी म्हणाले आहेत. अजित पवार भाषण करताना असं  म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

चीनमध्ये काल परवा लॉक डाऊन करण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे मागील वर्षी कोरोनाचे संकट असताना देखील विकास कामांना गती देण्याचे काम सुरु होते. पण आता कोरोना कमी झालाय पण गेलेला नाही. इथं तर पठ्ठ्यानी मास्कच काढून टाकलाय. असं चालणार नाही. असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.  

कोरोनात जीवा-भावाची माणसं सोडून गेलीत, त्यामुळे काळजी घ्या

आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये तेव्हाच मी मास्क काढतो. तुम्ही मला दोन वर्षात एकदा तरी विनामास्क पाहिले का? फक्त जेवताना आणि पाणी पिताना मास्क झोपताना तेवढा मास्क काढतो. अर्थसंकल्प सांगत असताना अनेक जण म्हणाले की, दादा मास्क काढा, तर मी म्हणालो की, माझा आवाज खणखणीत आहे. गमतीचा भाग जाऊ द्या, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे, आपण सर्वांनी कोरोना काळात मास्क न घालण्याची आणि काळजी न घेण्याची खूप मोठी किंमत मोजली आहे. अनेक जीवा-भावाची माणसं सोडून गेलीत, त्यामुळे काळजी घ्या”, असं अजित पवार म्हणाले.

पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार 

 उद्धव ठाकरे यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडता येईल, हा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील वाहतुकीचा प्रश्न मिटवण्यासाठी सर्व भागात मेट्रोचं जाळं पसरले पाहिजे, यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. मात्र, यासाठी केंद्राची देखील मदत आवश्यक असून याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे,” असं त्यांनी सागितलं.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcorona virusकोरोना वायरस बातम्या