शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या दबावाला बळी पडू नका; शिवसेनेची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 17:22 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊननुळे आधीच पालिकेचे उत्पन्न कमी झाले आहे.

ठळक मुद्देआयुक्तांना शिष्टमंडळाने दिले निवेदन 

पुणे : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक असलेली ३३ टक्केच कामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सत्ताधारी भाजपाच्या दबावाला बळी न पडता प्रशासनाने या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन अंदाजपत्रकातील सर्व कामांचे टेंडर आणि कार्यादेश देण्यासाठी आग्रह धरला असून सेनेचा या मागणीला विरोध असल्याचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले. यावेळी सह संपर्क प्रमुझ शाम देशपांडे        आणि प्रशांत बधे उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊननुळे पालिकेचे उत्पन्न कमी झाले आहे. उर्वरीत ८ महिन्यांमध्ये भरीव ऊत्पन्न मिळण्याची शक्यता कमी आहे. आधीच सत्ताधारी भाजपाने करांचे ओझे पुणेकरांवर लादले आहे. त्यांचा हट्ट पुरवण्याच्या नादामध्ये महागाईने त्रस्त पुणेकरांवर भविष्यात कोणतीही करवाढ होणार नाही हे पाहणे, शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रशासनाचे कर्तव्य आहे.ज्या आमदारांनी कोरोनासाठी ५० लाखाचे आमदार निधीचे पत्र दिले व त्यापोटी पालिकेला १० आणि २० लाखच निधी मिळाला. कोरोनाच्या काळामध्ये पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या अशा आमदारांची नावे जाहीर करावीत म्हणजे पुणे आणि पुणेकरांबद्दलचे भाजपाचे बेगडी प्रेम समोर येईल असेही मोरे म्हणाले..------------खासदार बापट यांना टोलाखासदार गिरीश बापट यांनी केंद्र शासनाने राज्य शासनाला निधी दिला आणि राज्य शासन पुणे महानगर पालिकेला निधी देत नाही असा जावईशोध लावला असून पुणेकरांचा दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. पालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची असताना विकास कामांचे टेंडर लावून कार्यादेश देण्याचा आयुक्तांवर दबाव बापट यांच्याकडून आणला जात आहे. बापट यांच्यासह सर्व आमदार, महापौर, उपमहापौर, सभागृह नेता व सर्व नगरसेवकांनी त्यांचे वेतन पीएम केअर फंडाला दिले.जर महाराष्ट्र आणि पुणेकर जनतेबद्दल तुम्हाला खरच कळवळा असेल तर तुम्ही मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पालिकेला निधी का दिला नाही आणि कधी देणार असा प्रश्न विचारावा. एक केंद्रीय मंत्री, दोन खासदार, सहा-सात आमदार आणि पुणे मनपाचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेता, उपमहापौर अशी सत्ता हातात असताना सुद्धा फक्त आढावा बैठका व राज्य शासनावर टीका करणे यापलीकडे जाऊन कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठीची भाजपाची कृती शून्य आहे

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाgirish bapatगिरीष बापट