शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

Bal gandharva Rangmandir: निवडणुकीच्या तोंडावर रोष नको; कलाकारांच्या विरोधाखाली दबला ‘बालगंधर्व’चा पुनर्विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:55 IST

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला नाट्य कलाकारांनी व बॅकस्टेज कलाकार, कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केल्याने हा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला

पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू आणि कलाकारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला नाट्य कलाकारांनी व बॅकस्टेज कलाकार, कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केल्याने हा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर कलाकारांचा रोष नको, म्हणून आता राजकीय नेतेही यावर काहीच बोलत नाहीत.

मुठा नदीकाठावर साकारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन २६ जून १९६८ रोजी भारताचे तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रारंभीपासूनच हे रंगमंदिर पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीचे मुख्य केंद्र आणि सांस्कृतिक जीवनाचे भूषण ठरले आहे. रंगमंदिराची रचना सांस्कृतिक जगतातील तत्कालीन दिग्गजांच्या सूचनेनुसार करण्यात आली. संगीत नाटकांचा देदीप्यमान काळ गाजवणारे बालगंधर्व यांचे नाव रंगमंदिरास देण्यात आले. अशा या ऐतिहासिक रंगमंदिराचा व परिसराचा कालानुरूप पुनर्विकास करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

या रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी २९ मे २०१९ रोजी तत्कालीन महापौर व शहरातील नाट्यकर्मींची बैठक झाली. या बैठकीत महापालिकेने प्रसिद्ध वास्तुविशारदांकडून प्रस्ताव मागविलेले होते. महापालिकेकडे आलेल्या प्रस्तावांपैकी आठ प्रस्तावांचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. त्यानंतर ३ डिसेंबर २०२०, ५ जानेवारी २०२१, १५ जानेवारी २०२१ आणि १ फेब्रुवारी २०२१, अशा चार बैठका झाल्या. यामध्ये अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे आर्किटेक सतीश कदम यांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यांना आराखड्यात काही बदल करण्याच्या सूचना यासंबंधीच्या महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीने केल्या.

या आराखड्यानुसार नव्या वास्तुतील मुख्य रंगमंचासह तीन छोटे रंगमंच, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हॉल, कलाकार आणि प्रेक्षकांच्या वाहनांसाठी वाहनतळ, कलाकारांसाठी होस्टेल आदी सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी १२५ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार होता. एका कंपनीने विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) माध्यमातून बांधकाम करता येईल, याचा अंदाज दिला आहे. तसेच, या नव्या थिएटर आणि जागेतून पालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते, त्याच्या योजनाही मांडली.

मात्र, या पुनर्विकासाला कला क्षेत्रासह विविध संस्था आणि संघटनांकडून विरोध झाला. या विरोधामुळे आणि वारंवार येणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर रोष नको म्हणून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव २०२२ पासून बाजूला ठेवला आहे. आता पुन्हा महापालिकेच्या निवडणूक होणार आहेत, त्यामुळे पुनर्विकासासाठी आग्रही असणारे नेते आता यावर काहीच बोलत नाहीत. त्यामुळे हा प्रस्ताव गुंडाळल्यात जमा आहे.

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरartकलाcultureसांस्कृतिकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका