शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत सालाबादप्रमाणे यंदाही भरला गाढवांचा बाजार, बाजाराला उतरती कळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 18:53 IST

जेजुरीत भरणारी पौषपौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी -विक्री ) पुरातन काळापासून प्रसिध्द आहे .

ठळक मुद्देविविध जातींच्या गाढवांची खरेदी विक्री

जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौषपौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी -विक्री होत असली तरी ही गाढवांची संख्या कमी होती. केवळ ५०० गावठी व काठेवाडी जातीच्या गाढवांची खरेदी विक्री झाली. जनावरे कमी आणि व्यापारी जास्त यामुळे जनावरांना मोठी मागणी राहिल्याने चढया भावात विक्री होत होती. यामुळे लाखोंची बाजाराची उलाढाल झाली. 

जेजुरीत भरणारी पौषपौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी -विक्री ) पुरातन काळापासून प्रसिध्द आहे . जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगाली पटांगणात शेकडो वर्षापासून येथे राज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बाराबलुतेदार परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी -विक्री करतात. या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये प्रामुख्याने राजस्थान ,गुजरात कर्नाटक ,आंध्र या राज्यासह महाराष्ट्रातील सातारा ,सांगली ,कराड ,बार्शी ,नगर ,बारामती ,पुणे फलटण, जामखेड ,आदी ठिकाणांवरून वैदू ,वडारी , कैकाडी ,बेलदार (पाथरवट ) आदी समाजबांधव येथे विविध जातींच्या गाढवासह दाखल होतात. गाढवांच्या खरेदी -विक्री बरोबरच देवदर्शन -कुलधर्म -कुलाचार आदी धार्मिक कार्यक्रम येथे होतात.

पूर्वीच्या काळी गाढवांचा वापर जड मालाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असे. आजच्या यांत्रिक युगामध्ये ओझे वाहण्यासाठी गाढवांचा वापर कमी झाला असल्याने गाढवांची संख्या कमी कमी होऊ लागली आहे. यंदा केवळ ५०० विविध जातींची गाढवे जेजुरीच्या बाजारात दाखल झाली होती. विशेषतः राजस्थानी —काठेवाडी जातीची  ७५ जनावरे होती. या गाढवाला सर्वात जास्त २५ ते ४० हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. तर गावरान,गावठी गाढवाला १० ते २५ हजार रुपये भावाची बोली लागत होती. राजस्थानी -काठेवाडी गाढव पांढरेशुभ्र असेल तर कर्नाटक -आंध्र येथून आलेले व्यापारी भावांमध्ये घासाघीस करताना दिसून येत होते.पूर्वीच्या काळी गारुडी ,कुंभार,परीट समाजबांधवही बाजारात दिसून येत असे आता मात्र फक्त मोजकेच समाजबांधव खरेदी -विक्री करताना दिसतात.गाढवांच्या दातावरून त्याचे वयाचे अनुमान काढले जाते.

दोन दातांचे दुवान हे गाढव तरुण मानले जाते. चार दातांचे चौवान हे मध्यमवयीन ,तर कोरा म्हणजे नुकतेच वयात येणारे असे अनुमान काढत त्यांचे दर ठरवले जातात.रंगावरूनही किमत करण्यात येते.पांढऱ्या शुभ्र जनावराला चांगला दर मिळतो.त्यानंतर गडद जांभळा ,तपकिरी लालसर,करडा अशा रंगाच्या प्रतवारीनुसार दर आकारले जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पूर्वीच्या काळी येथील बाजारात व तीन ते चार दिवस चालणाऱ्या यात्रेत गाढवांच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखोरुपयांची उलाढाल होत असे. परंतु सध्या परिस्थिती तशी राहिली नाही.केवळ वाडवडिलांनी घालून दिलेली येथील परंपरा जोपासण्यासाठी ही यात्रा करावयाची असे काही समाजबांधवांनी सांगितले. मात्र आजच्या यांत्रिक युगात, औद्योगिकीकरणामुळे गाढवांचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांची संख्या ही कमी होत आहे. गेल्या वर्षी एक हजार गाढवांची संख्या होती, यावर्षी ही संख्या निम्म्याने कमी झाली आहे. 

टॅग्स :Jejuriजेजुरी