गुरुवार पेठेतील जैन मंदिरातून दान पेटीच चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:12 IST2021-05-19T04:12:33+5:302021-05-19T04:12:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील मंदिरांमधील दान पेटी चोरीला जाण्याचे सत्र कायम असल्याचे दिसून येत आहे. गुरुवार पेठेतील ...

The donation box was stolen from a Jain temple in Pethe on Thursday | गुरुवार पेठेतील जैन मंदिरातून दान पेटीच चोरीला

गुरुवार पेठेतील जैन मंदिरातून दान पेटीच चोरीला

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील मंदिरांमधील दान पेटी चोरीला जाण्याचे सत्र कायम असल्याचे दिसून येत आहे. गुरुवार पेठेतील श्री नाकोडा भैरव जैन मंदिरातून चोरट्यांनी चांदीचा पत्रा लावलेली दान पेटीच चोरून नेली.

याप्रकरणी तेजपाल गोटीवाला (वय ५१, रा. गुरुवार पेठ) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १६ व १७ मे दरम्यान घडली.

गुरुवार पेठेतील श्री आदेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे गोटीवाला हे चेअरमन आहेत. श्री नाकोडा भैरव जैन मंदिर बंद होते. चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चांदीचा पत्रा लावलेली ५ किलो वजनाची लाकडी दान पेटी व त्यातील भाविकांनी दान केलेले ३ हजार रुपये रोख असा १ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The donation box was stolen from a Jain temple in Pethe on Thursday