अजेंडा ठरवून प्राधान्याने कामे करणार

By Admin | Updated: May 31, 2014 07:10 IST2014-05-31T07:10:26+5:302014-05-31T07:10:26+5:30

शिरूर लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी विरोधी पक्षाचा खासदार असतानाही संघर्ष करून अनेक कामे मार्गी लावली. आता सत्ता आहे

By doing agenda, doing priority tasks | अजेंडा ठरवून प्राधान्याने कामे करणार

अजेंडा ठरवून प्राधान्याने कामे करणार

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी विरोधी पक्षाचा खासदार असतानाही संघर्ष करून अनेक कामे मार्गी लावली. आता सत्ता आहे. अजेंडा ठरवून प्राधान्याने कामे करणार आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील प्रश्नही सोडविणार असल्याचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सांगितले. खासदार आढळराव-पाटील यांनी आज ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. या वेळी ते बोलत होते. आढळराव म्हणाले, ‘‘ विरोधी पक्षाचा खासदार म्हणून काम करत असूनही सर्वाधिक खासदार निधी आणला. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकींना मी कटाक्षाने हजर राहिलो. आमदारांना मिळतो तेवढाच निधी खासदार म्हणून भांडून मिळविला. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला २०१२मध्ये अर्थसंकल्पामसध्ये मंजुरी मिळाली. हा प्रकल्प आता नियोजन मंडळाकडे प्रस्तावित असून त्यासाठी १८०० कोटी रूपये खर्च येणार आहे. खेड-सिन्नर या रस्त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून आदिवासी गावांना जोडणारे रस्ते बांधून घेतले. माळशेज ते आणे या रस्त्यासाठी २९३ कोटी रुपयांचा निधी मिळविला. आता आमचे सरकार आहे. त्यामुळे अजेंडा ठरवून प्राधान्याने काही कामे मला करायची आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या कंपन्या खूप आहेत. तेथील ८० टक्के कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. त्यांना कायम करण्याचा प्रयत्न करणार आहे. स्थानिक भूमिपुत्रांना औद्योगिकरणाचा लाभ मिळवा यासाठी प्रयत्न करणार आहे. ससूनच्या धर्तीवर ग्रामीण भागात सुसज्ज आणि अद्ययावत रूग्णालयाची गरज आहे. घोरपडीतील ओव्हरब्रिज, हडपसरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवायचा आहे. इंद्रायणी नदीचे शुद्धीकरण करणार राष्ट्रीय नदी सुधार व संवर्धन कार्यक्र माअंतर्गत मुळा, मुठा नद्यांना ७५२ कोटींचा निधी मिळणार आहे. त्याअतंर्गत इंद्रायणीसाठी २०० कोटी रूपये मिळावे, असा माझा प्रयत्न आहे. महसूल आयुक्त व आळंदी नगरपरिषदेकडे प्रस्तावाची मागणी करत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: By doing agenda, doing priority tasks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.