शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील 114 ठिकाणी राेहित वेमुलावरील डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 21:12 IST

राेहितच्या आत्महत्येमागील कारण तसेच त्याच्या आत्महत्येनंतर करण्यात आलेले राजकारण याचे वास्तव दाखविणाऱ्या वी हिअर नाॅट कम हिअर टू डाय या डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन राेहितच्या तिसऱ्या स्मृती दिनी भारतातील 114 ठिकाणी करण्यात आले.

पुणे : 17 जानेवारी 2017 ला हैद्राबाद विद्यापीठातील वसतीगृहाच्या खाेलीमध्ये दलित विद्यार्थी राेहित वेमुला याने आत्महत्या केली हाेती. त्याच्या आत्महत्येला प्रशासनाला जबाबदार ठरविण्यात आले हाेते. त्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देश ढवळून निघाला हाेता. देशभरात विद्यार्थ्यंनी माेर्चे काढले हाेते. राेहितच्या आत्महत्येमागील कारण तसेच त्याच्या आत्महत्येनंतर करण्यात आलेले राजकारण याचे वास्तव दाखविणाऱ्या वी हिअर नाॅट कम हिअर टू डाय या डाॅक्युमेंटरीचे स्क्रिनिंग राेहितच्या तिसऱ्या स्मृतीदिनी भारतातील 114 ठिकाणी करण्यात आले. पुण्यातील पुणे कलेक्टिव्ह या तरुणांच्या ग्रुपने सुद्धा या डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन केले. 

राेहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली हाेती. हैद्राबाद विद्यापीठाने राेहित व त्याच्या साथिदारांना हाॅस्टेलमधून निलंबित केले हाेते. राेहित हा दलित असल्याने त्याला अन्यायकारक वागणूक दिल्याचा आराेप विद्यार्थ्यांनी केला हाेता. देशभरात राेहितच्या समर्थनार्थ अनेक माेर्चे निघाले. राेहितच्या आत्महत्येमागील पार्श्वभूमी व त्यानंतर झालेली आंदाेलने,  राजकारण याचा मागाेवा घेण्याचा प्रयत्न या डाॅक्युमेंटरीतून करण्यात आला आहे. या डाॅक्युमेंटरीमधील दृश्ये ही सत्य असून त्या त्या वेळी ती चित्रीत करण्यात आली आहेत. दीपा धनराज यांनी या डाॅक्युमेंटरीचे दिग्दर्शन केले आहे. 

दीपा यांनी राेहितच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त ज्यांना या डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन करायचे आहे त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले हाेते. पुण्यातील पुणे कलेक्टिव्ह या तरुणांच्या ग्रुपने या डाॅक्युमेंटरीसाठी दीपा यांना संपर्क केला हाेता. 17 तारखेला काेथरुडमधील एका बंगल्यात या डाॅक्युमेंटरीचे स्क्रिनिंग करण्यात आले. हे स्क्रिनिंग आयाेजित करणारा अनुज देशपांडे म्हणाला, राेहित वेमुलाची आत्महत्या ही आपल्या देशातील एक महत्वाची घटना आहे. या डाॅक्युमेंटरीच्या माध्यमातून त्याच्या आत्महत्येमागील सत्य समजून घेता येईल या उद्देशाने आम्ही या डाॅक्युमेंटरीचे स्क्रिनिंग आयाेजित केले हाेते. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यू