शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय घेत हातोडीने डोक्यात वार करत डॉक्टर पत्नीचा निर्घृण खून; पिंपरीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 17:51 IST

तलाठी असलेला आरोपी पती चिठ्ठी लिहून फरार : प्रेमविवाह असूनही चारित्र्यावर घेतला संशय

पिंपरी : तलाठी असलेल्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन डॉक्टर असलेल्या पत्नीचा चाकूने वार करून डोक्यात हातोडीने मारून निर्घृण खून केला. ती मला साथ देत नव्हती, त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली, मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून तलाठी पती फरार झाला. बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सोमवारी (दि. ६) सकाळी ही घटना उघडकीस आली. 

सरला विजय साळवे (वय ३२), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विजयकुमार साळवे (वय ३५, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सरला ही भंडारा जिल्ह्यातील होती. तर आरोपी आरोपी विजयकुमार हा गोंदीया जिल्ह्यातील आहे. सरला व विजय यांचा २०१९ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मयत सरला ही पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. तर आरोपी विजयकुमार हा जुन्नर तालुक्यातील आळेगावात तलाठी आहे. 

मयत सरला आणि तिचा आरोपी पती विजयकुमार यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे फ्लॅट खरेदी केला. नवीन फ्लॅटची शनिवारी (दि. ४) वास्तूशांत केली. त्यानंतर सरला व विजयकुमार हे दोघेही तेथेच मुक्कामी थांबले. मात्र त्या दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे त्यांच्या नातेवाईक व मित्रांच्या निदर्शनास आले. काही जणांनी रविवारी (दि. ५) त्यांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही. त्यामुळे साळवे यांच्या मित्रांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पाहणी केली असता साळवे यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. त्यामुळे चावीवाल्याकडून चावी तयार करून कुलूप उघडून घरात पाहणी केली. त्यावेळी घरात सरला जखमी अवस्थेत दिसून आल्या. त्यामुळे त्यांना पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले.  मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.   

पोलिसांना मिळाली ‘चिठ्ठी’आरोपी पती विजयकुमार याला पत्नी डाॅ. सरला यांच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. ती मला साथ देत नव्हती, त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली. मला माफ करा, अशा आशयाचा मजकूर असलेली आरोपी विजयकुमार याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली.

प्रेमाला लागली दृष्टउच्चशिक्षित असलेल्या मयत सरला आणि आरोपी विजयकुमार यांनी प्रेमविवाह केला. सुखी संसाराला सुरुवात झाली. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच आरोपी विजयकुमार याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि तेथेच त्यांच्या प्रेमाला दृष्ट लागली. तरीही त्यांनी बोऱ्हाडेवाडी येथे नवीन फ्लॅट खरेदी करून त्याची वास्तूशांतही केली. मात्र मनातील संशय विजयकुमारला शांत बसू देत नव्हते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस