शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बंद  '' एक्स रे '' मशिनवर डॉक्टरांच्या बदल्यांचा उतारा :आरोग्य विभागाचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 14:20 IST

गाडीखाना दवाखान्यातील एक्स रे मशीन बंद असल्यामुळे टीबी, एड्ससह विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे

ठळक मुद्देडॉ. कोटणीस दवाखान्यातील मशीन दीड महिन्यांपासून बंदच      

पुणे : पालिकेच्या डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रामधील (गाडीखाना) एक्स रे मशीन दीड महिन्यांपासून बंद पडलेली असून हे मशीन दुरुस्त करण्याऐवजी डॉक्टरांच्या बदल्या करण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. आरोग्य कार्यालयाच्या मेडिकल युनिटच्या कामकाजाच्या सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्याचे कार्यालयीन आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.   गाडीखाना दवाखान्यातील एक्स रे मशीन बंद असल्यामुळे टीबी, एड्ससह विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ही मशीन नादुरुस्त होऊन दीड महिना होत आला आहे. रुग्णालयातील क्ष-किरण विभागातील डॉक्टरांनी आरोग्य विभागाला याबाबत कळविले होते. परंतू, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे चित्र आहे.पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरु करण्यात आलेल्या एक्स रे मशिन्सच्या सुविधेचे खासगीकरण करण्यात आलेले आहे. एका खासगी संस्थेला हे काम देण्यात आलेले आहे. त्यामुळे रुग्णांकडून ६० रुपयांपासून पुढे शुल्क आकारणी केली जाते. शासकीय आणि पालिकेच्या आरोग्य योजनांमधील रुग्ण आले तर त्यांना मोफत सेवा देणे बंधनकारक आहे. गाडीखाना दवाखान्यामध्ये कोणतेही शुल्क न आकारता एक्स रे मशिनची सुविधा पुरविली जात होती. परंतू, मशिनच बंद पडल्याने हे काम ठप्प झाले आहे.   साधारणपणे आठ-नऊ वर्षे जुने असलेले हे मशीन दीड महिन्यांपुर्वी बंद पडले. हे मशीन सुरु करण्यासाठी उत्पादक कंपनीकडून तपासणी करुन घेतल्यानंतर  दहा लाख रुपये खर्च सांगण्यात आला. त्याचे कोटेशन गाडीखाना दवाखान्यातील डॉक्टरांनी आरोग्य विभागाला पाठवून दिले होते. त्यावर अद्याप निर्णयच झाला नाही. मशीन दुरुस्त करणे अथवा नवीन मशीन खरेदी करण्याऐवजी आरोग्य विभागाने डॉक्टरांच्या बदल्या केल्या आहेत.   =चौकट=डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रामधील रेडिओलॉजिस्ट डॉ. विद्या गायकवाड यांची पुढील आदेश होईपर्यंत कमला नेहरु रुग्णालयात तर अनुराधा कोकरे (आॅ. नर्स) यांची मित्र मंडळ चौकातील राजमाता जिजाऊ प्रसुतीगृहामध्ये बदली करण्यात आली आहे. सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे आणि आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी हे आदेश दिले आहेत.  

टॅग्स :PuneपुणेMedicalवैद्यकीयHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका