शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

डॉक्टरांचा आज संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 3:29 AM

केंद्र शासनाच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकासंदर्भातील चूकीच्या धोरणाविरोधात देशभरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांकडून येत्या २ जानेवारी रोजी ‘काळा दिवस’ पाळणार जाणार आहे.

पुणे : केंद्र शासनाच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकासंदर्भातील चूकीच्या धोरणाविरोधात देशभरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांकडून येत्या २ जानेवारी रोजी ‘काळा दिवस’ पाळणार जाणार आहे.पुण्यातील डॉक्टरही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे मंगळवारी रुग्णालयामधील केवळ आपात्कालीन सेवा सुरु राहणार आहेत. सर्व डॉक्टरांनी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२ तास संप पुकारला आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या मुद्यावरून नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच डॉक्टर विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष पेटणार आहे.केंद्र शासनाच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा देशभरातील डॉक्टरांना मान्य नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेने २ जानेवारीला देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा गरीब रुग्ण व लोकशाहीच्याही विरोधात आहे. तसेच वर्षभरापासून केंद्र शासनाशी नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, शासनाकडून अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या नवीन विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढेल.तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांवर कोणाचाही वचक राहणार नाही. त्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे.या विधेयकाच्या माध्यमातून केंद्र शासन वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदांवर राजकीय किंवा अवैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना घेवून येण्याचा प्रयत्नात आहेत.त्यास विरोध असल्याचे आयएमएने पुणे विभागीय अध्यक्ष डॉ.प्रकाश मराठे यांनी कळविले आहे.

टॅग्स :docterडॉक्टरStrikeसंप