शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रोसिटीची भीती दाखवत डॉक्टरांकडून उकळली ७५ लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 16:47 IST

मिटविण्यासाठी आला अन खंडणी घेऊन गेला

ठळक मुद्देधनादेशाद्वारे ५४ लाख व रोख २१ लाख रुपये असे ७५ लाख रुपये उकळले एकाच दिवशी

पुणे : डॉक्टरांच्या बिलावरुन झालेल्या वादातून महिलेने केलेल्या खोट्या तक्रारीत अ‍ॅट्रोसिटीची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपयांच्या खंडणीपैकी डॉक्टरांकडून तब्बल ७५ लाख रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्य म्हणजे हे विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर ती मिटविण्यासाठी आलेल्या डॉक्टर मित्राच्या भावानेच हे कृत्य केले़ ७५ लाख रुपये दिल्यानंतरही उरलेले ५५ लाख रुपये दिले नाही तर मुलाला अटक होईल, अशी धमकी दिल्याने शेवटी या डॉक्टरांनी पोलिसांकडे धाव घेतली.विश्रामबाग पोलिसांनी मनोज अडसुळ (अत्र) (रा़ नवी पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पर्वतीमधील एका ६९ वर्षाच्या डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवार पेठेतील एका नर्सिग होममध्ये १८ ऑक्टोबर २०१९ रोजी घडला होता. याबाबतची माहिती अशी, फिर्यादी यांचा मुलगाही ही डॉक्टर आहे. त्याच्या मुलाने एका महिलेवर उपचार केले होते. त्या औषधोपचाराचे बिल अधिक असल्याचे महिलेचे म्हणणे होते. त्यावरुन वाद झाल्यावर या महिलेने विश्रामबाग पोलिसांकडे फक्त तक्रार अर्ज दिला होता.  त्यावेळी हे डॉक्टर, त्यांचा मुलगा, डॉक्टर व त्यांचा भाऊ मनोज असे सर्व जण पोलिसांकडे गेले होते. ही खोटी तक्रार असल्याचे पोलिसांच्या चौकशीत लक्षात आल्यावर त्यांनी त्यात पुढे काही कारवाई केली नव्हती. त्याचा गैरफायदा मनोज अडसुळ याने घेतला़ त्यांनी डॉक्टरांना ही महिला दलित मुस्लिम समाजाची आहे़ तुमच्या मुलावर, बलात्कार, अ‍ॅट्रोसिटी असा गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच दलित समाजाच्या संघटना मुलाला अटक करा व कारवाई करण्यासाठी मागे लागले असल्याचे सांगत होता. या गुन्ह्यात ३ ते १० वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी भिती त्याने डॉक्टरांना दाखविण्यास सुरुवात केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले़ घाबरलेल्या डॉक्टरांनी पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार त्याने धनादेशाद्वारे ५४ लाख व रोख २१ लाख रुपये असे ७५ लाख रुपये एकाच दिवशी त्यांच्याकडून उकळले.डॉक्टर घाबरलेले असल्याने त्यांच्याकडून आणखी पैसे उकळण्यासाठी तो उरलेले ५५ लाख रुपये द्यावेत, यासाठी डॉक्टरांकडे सातत्याने मागणी करत होता. तसेच उर्वरित रक्कम न दिल्यास मुलाला अटक होईल व कारवाई होईल अशी धमकी देत होता. शेवटी त्यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली़ खंडणी विरोधी पथकाने या महिती घेतल्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाdoctorडॉक्टरPoliceपोलिस