शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनी चमत्कार केला, आता‘राधा’लाही डॉक्टरच करायचंय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 17:46 IST

‘राधा’ म्हणजे प्रत्यारोपित गर्भाशयातून जन्माला आलेले देशातील पहिले बाळ...

ठळक मुद्दे४०६ क्रमांकाच्या खोलीचे नामकरण ‘मीनाक्षी रुम’ राधाला निरोप देताना डॉक्टरांची टीमही भावनाविवशदहा महिन्यांचा खडतर प्रवास संपवून आई-वडिलांसह राधा गुजरातमधील आपल्या घराकडे रवाना

पुणे : दोन मुले जन्माला येण्यापुर्वीच दगावली, तर जन्म झाल्यानंतर काही दिवसांतच दोघांचा मृत्यू झाला... अनेक यातना सहन केलेल्या या मातेला गर्भाशय प्रत्यारोपणातून पुन्हा आशेचा किरण दिसला. काही दिवसात ‘राधा’ जन्माला आली. या मातेसाठी हा चमत्कार होता, डॉक्टरांनी केलेला. आता ‘राधा’लाही डॉक्टरच करायचे, असा निर्धार करत या मातेने तिच्यासह पुण्याला सलाम करत गुजरातची वाट धरली.‘राधा’ म्हणजे प्रत्यारोपित गर्भाशयातून जन्माला आलेले देशातील पहिले बाळ. ज्या गर्भाशयातून तिच्या आईचा जन्म झाला. त्याच गर्भाशयातून तिचाही जन्म झाला आहे. पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमधे दि. १८ आॅक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी तिचा जन्म झाला.तिची आई मीनाक्षी (वय २८) व वडील हितेश वालंद हे गुजरातचे राहणारे. फेब्रुवारी महिन्यापासून ते रुग्णालयात होते. जन्मानंतर मुलींची प्रकृती स्थिर होईपर्यंत रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तिची काळजी घेतली. तिची तब्बेत आता ठणठणीत असून मागील दहा महिन्यांचा खडतर प्रवास संपवून गुरूवारी (दि. १३) आई-वडिलांसह राधा गुजरातमधील आपल्या घराकडे रवाना झाली. मीनाक्षी यांचा दोन वेळा गर्भपात झाला. तर दोन मुले दगावली. पण आई होण्याची त्यांची प्रखर इच्छा होती. त्यामुळे त्यांची आई सुशीलाबेन (वय ४८) यांनी आपले गर्भाशय देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार दि. १७ मे २०१७ रोजी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर दीड वर्षांनी या गर्भाशयातून चिमुकलीचा जन्म झाला. जन्मावेळी राधाचे वजन १४५० ग्रॅम होते. पण ती आईचे दुध घेऊ शकत नव्हती. काही दिवस नाकातून नळीद्वारे दुध द्यावे लागत होते. तिला एकदा कावीळही झाली होती. श्वास घेण्यास त्रास होत होता. पण डॉक्टरांनी रात्रं-दिवस काळजी घेत राधा ठणठणीत बरे केले. आता तिचे वजन २६५० ग्रॅम झाले आहे. त्यानंतर रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, असे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी सांगितले. राधाला निरोप देताना डॉक्टरांची टीमही भावनाविवश झाली होती. मीनाक्षी यांनाही भावना अनावर झाल्या. यावेळी डॉ. सीमा पुणतांबेकर, डॉ. मिलिंद तेलंग, डॉ. पंकज कुलकर्णी आदी उपस्थित होते.  -----------------‘राधा’च्या जन्मामुळे खुप आनंद झाला आहे. हे सगळे स्वप्नवत आहे. हे डॉक्टरच आमच्यासाठी देव आहेत. त्यामुळे माझ्या मुलीलाही त्यांच्यासारखे डॉक्टरच करणार आहे. रुग्णालयच आमचे दुसरे घर बनले होते. आता गुजरातमध्येही राधाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे खुप आनंद आहे.

..............................

- मीनाक्षी व हितेश वालंद असे झाले नामकरण 

मीनाक्षी या कृष्णाच्या भक्त आहेत. त्यामुळे मुलगा झाला तर कन्हैया आणि मुलगी झाली तर राधा असे नाव ठेवायचे, असे ठरविले होते. तिला ‘झील’ (झरा) असे टोपण नावही देण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात मीनाक्षी या रुग्णालयातील ४०६ क्रमांकाच्या खोलीमध्ये होत्या, त्या खोलीचे नामकरणही आता ‘मीनाक्षी रुम’ असे करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटल