शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वा-यावर?, आवश्यक सोयीसुविधा नाही; तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 05:02 IST

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना वाचनालय, ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही.

पुणे : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना वाचनालय, ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. तसेच शासनाकडून मिळणा-या मानधनात पुण्यात राहणे शक्य होत नाही, असे काही विद्यार्थ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने वाºयावर सोडले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण इतर समाज घटकांच्या तुलनेत कमी आहे. योग्य प्रशिक्षणाअभावी भारतीय प्रशासकीय सेवेत तसेच राज्य सेवेसाठी घेण्यात येणाºया स्पर्धा परीक्षांमध्ये ते पात्र ठरत नाहीत. त्यामुळे राज्याच्या आदिवासी विकास विभागातर्फे या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र, या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वत: पूर्ण न करता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेकडे दिली आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळत आहे. मात्र, परंतु, विद्यार्थ्यांना इतर सोयी-सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.काही दिवसांपूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी विविध समस्या मांडण्यासाठी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबरच वाचनालयाची व्यवस्था करून देणे आवश्यक आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमधील इमारतीत काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. मात्र, संस्थेने इमारतीमधील वाचनालय बंद केले. परिणामी अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी जावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तकांची आवश्यकता आहे. त्यामुळे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सुसज्ज ग्रंथालय उभे करून द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.बार्टीकडून चांगले मार्गदर्शन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांना इतर सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आता स्वायत्त झाली आहे. त्यामुळे बार्टीप्रमाणे या संस्थेनेही आम्हाला आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी