पेरणीनंतर बियाणे उगवले नाही म्हणून रडत बसू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:10+5:302021-06-18T04:08:10+5:30
त्यानुसार बियाणे लावल्यावर ते उगवले नाही, अशी पश्चात्तापाची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये. त्यासाठी बियाणांची तपासणी पद्धत माहिती करून घ्यावी. ...

पेरणीनंतर बियाणे उगवले नाही म्हणून रडत बसू नका
त्यानुसार बियाणे लावल्यावर ते उगवले नाही, अशी पश्चात्तापाची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये. त्यासाठी बियाणांची तपासणी पद्धत माहिती करून घ्यावी. या पद्धतीने बियाणांच्या यशस्वी तपासणीनंतरच पेरणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी उगवणशक्ती तपासल्याशिवाय कोणत्याही पिकांच्या बियाण्याची पेरणी करू नये. सध्या खरिपाच्या पेरणीला सुरुवात होत आहे. त्यासाठी हा प्रयोग करावा व नंतर पेरणी करावी. एक पोते ओले करून त्यावर मोजून शंभर बिया ठेवा. त्या बियांवर आणखी एक पोते ओले करून त्याने झाका. पोत्याची ओल कमी होऊ देऊ नका, दोन ते तीन दिवसांनी बियांना अंकुर फुटले की त्याची मोजणी करा. १०० पैकी ८० बिया अंकुरल्या तर त्या बियाण्यांची उगवण शक्ती ८० टक्के आहे, असे समजावे.
तसेच उगवण शक्ती ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यानंतरच बियाणे पेरावे. या व्यतिरिक्त आपण खरेदी केलेली बियाणांची बॅग फोडताना ज्या बाजूला टॅग आहे, त्या बाजूने न फोडता विरुद्ध बाजूने फोडावी. दुकादारांकडून पक्के बिल घ्यावे. पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास जिवाणू खतांची व औषधाची बीजप्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
————————————————