पीएमपी कामगारांवर कारवाई करू नका

By Admin | Updated: April 28, 2017 06:04 IST2017-04-28T06:04:30+5:302017-04-28T06:04:30+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने वर्षातील २४० पेक्षा कमी दिवस हजर असणाऱ्या वाहक-चालक आणि मेकॅनिक

Do not take action against the PMP workers | पीएमपी कामगारांवर कारवाई करू नका

पीएमपी कामगारांवर कारवाई करू नका

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने वर्षातील २४० पेक्षा कमी दिवस हजर असणाऱ्या वाहक-चालक आणि मेकॅनिक अशा ६६० कर्मचाऱ्यांना गैरहजेरीसंबंधी बडतर्फ का करू नये अशी नोटीस बजावली होती. या संबंधी औैद्योगिक न्यायालयात १२ कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. न्यायालयाने १२ जून रोजी पीएमपीला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले असून, तोपर्यंत करवाई न करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे.
पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी वर्षातील २४० दिवसांपेक्षा कमी दिवस हजर राहणाऱ्या वाहक-चालक आणि मेकॅनिकवर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. ६६० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यासंबंधी नोटीस बजावली होती.

Web Title: Do not take action against the PMP workers