विजय मल्ल्याप्रमाणे पळून नाही जाणार,आम्ही सगळ्यांचे पैसे परत करणार, पुन्हा भरारी घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 04:51 AM2017-11-22T04:51:10+5:302017-11-22T04:51:38+5:30

पुणे : गेले वर्षभर आर्थिक अडचणीमुळे अनेकांचे पैसे परत करु शकलो नाही़ आता त्यातून बाहेर पडत आहे़ उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत कसे करणार याचा आराखडा देणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार सगळ्यांचे पैसे परत करणार आहोत़.

Do not run like Vijay Mallya, we will pay back all the money, take it again | विजय मल्ल्याप्रमाणे पळून नाही जाणार,आम्ही सगळ्यांचे पैसे परत करणार, पुन्हा भरारी घेऊ

विजय मल्ल्याप्रमाणे पळून नाही जाणार,आम्ही सगळ्यांचे पैसे परत करणार, पुन्हा भरारी घेऊ

Next

पुणे : गेले वर्षभर आर्थिक अडचणीमुळे अनेकांचे पैसे परत करु शकलो नाही़ आता त्यातून बाहेर पडत आहे़ उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत कसे करणार याचा आराखडा देणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार सगळ्यांचे पैसे परत करणार आहोत़. विजय मल्ल्याप्रमाणे कोठेही पळून जाणार नाही, असे बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके)यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले़
डीएसके यांच्याविरुद्ध गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत़ त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे़ या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष हेही उपस्थित होते़ डीएसके म्हणाले, आम्ही १९८० पासून बांधकाम व्यवसायासाठी मुदत ठेवी घेत असून नोव्हेंबर २०१६ पर्यंत कोणाचेही पैसे बाकी नव्हते़ ड्रीम सिटीमुळे अडचणीत आलो आहे़ इस्रायली कंपनीबरोबर सोलापूर रोडला डायमंडचा सेझ प्रकल्प सुरू करणार होतो़ ५ वर्षात प्रकल्प उभा राहिला नाही तर शेतकºयांना जमीन परत द्यावी लागते़ त्यामुळे या जमिनी प्रथम डीएसके कुटुंबियांच्या नावावर घेतल्या. नंतर त्या कंपनीला ५ ते १० टक्के चढ्या भावाने विकल्याचे डीएसके यांनी कबुल केले़ मालमत्तेचा बँकांनी ताबा घेतला असला तरी बंद १३ गृहप्रकल्पाचे काम सुरू करत आहोत़ त्यातून २ हजार कोटी व ड्रीम सिटीतून १० हजार कोटी रुपये मिळतील. सर्व मालमत्तांची किंमत ९ हजार १२४ कोटी रुपये होत असून १५०० कोटींची देणी
आहेत़ गुंतवणूकदारांचे नोव्हेंबर २०१७ अखेर १६५ कोटी रुपये देणे
आहे़ २०२० पर्यंत मुदत ठेवींचे ५८९ कोटी रुपये द्यायचे असून दरमहा मुदत पूर्ण होणाºया ठेवीचे पैसे देण्यासाठी १५ कोटी रूपये लागतात़ त्याचा आराखडा उच्च न्यायालयाला देत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
>राजकीय नेत्याने केला होता प्रयत्न
आपली कंपनीत आर्थिक अडचणीत आल्यानंतर एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने सुमारे १० महिन्यांपूर्वी गुंतवणूकदार शोधण्यासाठी प्रयत्न केला होता, असे सांगून डीएसके म्हणाले, ड्रीम सिटीपेक्षा पाचपट मोठे प्रकल्प करणाºया या व्यावसायिकाने मंदीमुळे गुंतवणूक करण्यास नकार दिला़ आता परदेशी गुंतवणुकदारच आमच्याकडे गुंतवणूक करू शकतात़

Web Title: Do not run like Vijay Mallya, we will pay back all the money, take it again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.