भाडेवाढ करा नाहीतर देणी द्या
By Admin | Updated: June 24, 2014 22:47 IST2014-06-24T22:47:11+5:302014-06-24T22:47:11+5:30
पीएमपी जगू द्यायची असेल तर तिकीट दरवाढ करा किंवा दोन्ही महापालिकांनी देणी द्या, असे दोनच पर्याय आता शिल्लक आहेत.

भाडेवाढ करा नाहीतर देणी द्या
>पुणो : सुमारे 5क्क् बस बंद, कर्मचा-यांचे पगार देण्यास पैसे नाहीत अशा परिस्थितीत पीएमपी जगू द्यायची असेल तर तिकीट दरवाढ करा किंवा दोन्ही महापालिकांनी देणी द्या, असे दोनच पर्याय आता शिल्लक आहेत. जुलै महिन्यात पीएमपी रस्त्यावर उतरवायची असेल, तर संचालक मंडळाने ठोस आणि सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
नव्या आर्थिक वर्षातील संचालक मंडळाची दुसरी बैठक बुधवारी (दि.25) स्वारगेट येथील मुख्यालयात होणार आहे. त्यामध्ये तिकीट दरवाढीचा विषय आहे. डिङोल व सीएनजी दरवाढीमुळे आणि आस्थापना खर्चातील वाढीमुळे तिकीट दरवाढ करण्याबाबत मागील सभेमध्ये चर्चा झाली होती. परंतु त्यावरील निर्णय न झाल्याने हा विषय पुढे ढकलण्यात आला.
डिङोल दरवाढ होत असली, तरी तिकीट दरवाढ झालेली नाही. परंतु आता पीएमपीचे अस्तित्व धोक्यात आल्याने दरवाढीचा विषय तातडीने घेण्यात येत आहे. आता पीएमपीला जगविण्याकरीता तिकीट दरवाढ करण्याबाबत विचार सुरु करावा लागत आहे. दोन्ही महापालिकांकडून पीएमपीला सुमारे 185 कोटी रुपयांची येणी आहेत. (प्रतिनिधी)
संचालक मंडळ
करतेय काय?
पीएमपीच्या संचालक मंडळावर पुणो आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे महापौर, आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष आहेत. त्यांच्यापासून पीएमपीची आर्थिक परिस्थिती लपलेली नाही. परंतु तरीही महापालिकांकडून येणी वसूल झालेली नाहीत.
निधीचे काय?
केंद्र सरकारने जेएनएनयुआरएम अंतर्गत पीएमपीला बसखरेदीकरीता निधी दिला आहे. परंतु याला बराच काळ उलटून गेल्याने हा निधी रद्द होण्याची शक्यता असल्याचा आरोप संचालकांनी केला आहे. त्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.