शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

१ एप्रिलपासून कोणत्याही राजकीय,सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करू नका; अजित पवारांची लोकप्रतिनिधींना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 21:03 IST

कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वच राजकीय नेत्यांनी लग्न सोहळ्यांना देखील उपस्थित राहण्याचे टाळावे, असे देखील अजित पवारांनी यावेळी म्हणाले.

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमका पुण्यात लॉक डाऊन जाहीर करणार की कडक निर्बंध लादणार या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.मात्र तूर्तास तरी पुणेकरांवरचा लॉकडाऊन टळला आहे.पण याचवेळी पवारांनी पुणेकरांसह राजकीय नेत्यांना देखील चांगलीच तंबी दिली आहे. 

पुण्यात शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी वाढती रुग्णसंख्या आणि लॉकडाऊन निर्णयावर भाष्य करतानाच नागरिकांसह राजकीय नेत्यांना देखील कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नियमांचे कटाक्षाने पालन करण्याची सूचना केली आहे. या आढावा बैठकीला लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पुणे, पिंपरी चिंचवडचे महापौर, जिल्हाधिकारी, दोन्ही महापालिका आयुक्त,पोलिस आयुक्त उपस्थित होते.

पवार म्हणाले, सध्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीणमधील  परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच १ एप्रिलपासून सर्वच लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचे उद्घाटन, भूमिपूजन, सभा, यांसह सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. तसेच कोणत्याही लग्न किंवा इतर समारंभाला देखील उपस्थित राहू नये. 

पवार म्हणाले, लग्न लॉनमध्ये करा किंवा आणखी कुठे संख्या ५० पेक्षा जास्त असता कामा नये. अंत्यविधीला २० पेक्षा जास्त लोक नकोत. कोरोना रुग्णांची संख्या मागील वेळेपेक्षा वाढली आहे. रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरू होणार आहे. नियमांचे पालन केले नाही, आणि अशीच रुग्णसंख्या वाढ कायम राहिली तर २ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. 

लग्न सोडून इतर समारंभ पूर्ण बंद करावेत. उद्यान, बाग बगीचे सकाळीच सुरू राहणार.  मॉल, मार्केट, चित्रपट गृह ५० टक्के उपस्थितीमध्ये सुरु ठेवण्यात येतील. सार्वजनिक वाहतूक सुरूच ठेवणार, ऑक्सिजन प्लँट चाकण जवळ झालाय त्यामुळे पुरवठा सुरळीत, कमी पडला तर राजगडमध्ये बोलून ठेवत आहोत. पुणे शहराच्या जम्बो केंद्रातील बेड पूर्ण क्षमतेने सुरू करणार, पिंपरी चिंचवडमधील जम्बो १ एप्रिलपासून पूर्ण वापरत आणणार, ससून ३०० ऐवजी ५०० कोविड बेड करणार असल्याचे सांगताना अजित पवारांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ब्रेक करायचे असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असे म्हटल्याने लॉकडाऊनचा विचार होत असल्याचे सुतोवाच दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारणmarriageलग्नAjit Pawarअजित पवार