शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘साहेब मारू नका, मीच खून केलाय’, फिर्यादीच निघाला आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 01:43 IST

फिर्यादीच निघाला आरोपी : वडगाव मावळला ट्रकचालकाचा खून 

वडगाव मावळ : ट्रकमध्ये स्वयंपाक करीत असताना किरकोळ वादातून एका ट्रकचालकाने दुसरा सहकारी चालकाच्या छातीवर कांदा कापण्याच्या सुरीने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव-तळेगाव फाटा येथे बुधवारी (दि. १९) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

बांकेलाल जयनारायण ओझा ऊर्फ  गौडा (वय ३८, रा. बामनेर, जि. मुरणा, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा सहकारी चालक राकेश जगजितसिंग यादव (वय ४४, रा. बामनेर, जि. मुरणा, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांकेलाल व यादव हे दोघे त्यांचा मुंबईकडून ट्रक अहमदनगरकडे घेऊन जात होते. वडगाव-तळेगाव फाट्यावर त्यांनी ट्रक थांबविला. त्यावेळी स्वयंपाक करताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यात बाचाबाची झाल्याने यादव याने बांकलाल याच्या छातीवर कांदा कापण्याच्या सुरीने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने बांकेलाल याचा मृत्यू झाला.  घटनेनंतर राकेश यादव पोलिसांकडे गेला. माझा सहकारी चालक बांकेलाल याचा कोणीतरी खून केला आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत अधिक चौकशी सुरू केली. उपनिरीक्षक दिलीप देसाई, विश्वास आंबेकर, कविराज पाटोळे, मनोज कदम, गणेश तावरे, अमोल गवर यांनी यादव याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच यादव याने गुन्हा कबूल केला. साहेब मारू नका, मीच खून केला आहे, असे त्याने सांगितले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस