शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

दारूला पैसे न दिल्याने डोक्यात दगड घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 10:00 IST

याबाबत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव यांनी सांगितले

पुणे : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खडक पोलिसांनी आरोपीला पकडले असून डोक्यात दगड घालून खून केलेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. बाबासाहेब कुऱ्हाडे (वय ३५, रा़ हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना मामलेदार कचेरीच्या जवळील फुटपाथवर पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव यांनी सांगितले की, बाबासाहेब कुऱ्हाडे याने काल रात्री एका तरुणाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. त्याने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. तेव्हा कुऱ्हाडे हा त्याच्यामागोमाग गेला व तो कोठे राहतो हे पाहिले, त्यानंतर हा तरुण मामलेदार कचेरी जवळील एका दुकानाच्या बाहेरील फुटपाथवर झोपला. पहाटे पावणे दोनच्या सुमारास कुऱ्हाडे हा तेथे आला व त्याने तेथील दगड उचलून त्या तरुणाच्या डोक्यात घातला. त्यात त्या तरुणाचा जागीच मृत्यु झाला. त्याच्या आरडाओरडाने आजूबाजूच्या लोकांनी पळून जाणाऱ्या कुऱ्हाडेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मृत्यु झालेल्या तरुणाची अदयाप ओळख पटली नसून त्याच्या कपड्यांवरुन तो फिरस्ता असावा, असा पोलिसांना संशय आहे, खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrime Newsगुन्हेगारी