शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

डीजेचा होतो हृदयाला त्रास, मंडळांना परवानगी नको : ग्रामपंचायत व पोलिसांना अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 1:42 PM

२५ दुकानदारांनी एकाच जागेवर डीजे व लेझर लाइट लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 

ठळक मुद्दे२५ व्यापाऱ्यांचा एकत्रितपणे विरोध 

लोणी काळभोर : डीजेच्या अतिआवाजाने व मोठ्या आवाजाच्या हादऱ्याने हृदयाला त्रास होतो, छाती दुखू लागते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने आवाजावर नियंत्रण ठेवावे, असे आदेश देऊनही डीजे लावले जातात, यास कंटाळून लोणी काळभोर येथील जुनी अंबरनाथ भाजी मंडई परिसरातील एकूण २५ दुकानदारांनी या भागात एकाच जागेवर डीजे व लेझर लाइट लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी एका अर्जाद्वारे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. लोणी काळभोर येथील जुनी अंबरनाथ भाजी मंडई परिसरात मुख्य रस्त्यालगत स्टेशनरी- कटलरी, किराणा, कासार, स्वीट होम, भांडी, फोटो स्टुडिओ, फोटो फ्रेम, लेडिज शॉपी, टेलर, कपडे, झेरॉक्स, हॉटेल आदी दुकाने तसेच दाट लोकवस्ती आहे. आजकाल डीजेचे फॅड असल्याने कोणताही उत्सव, जयंती, वाढदिवस व इतर कोणतेही कार्यक्रम असले तरी डीजे लावला जातो. कार्यक्रम मळ्यात अथवा गावात साजरा करण्यात येतो तरी डीजे व लेझर लाईट मात्र अंबरनाथ भाजी मंडई नजीक वर्दळीच्या ठिकाणीच लावला जातो. मोठ्या आवाजातून निर्माण होणाऱ्या मोठ्या कंपनामुळे एकतर ग्राहक फिरकत नाहीत व दुकानातील वस्तू खाली पडतात. फर्निचरच्या काचा तुटतात, झेरॉक्स व इतर मशिन बंद पडतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. लेझर लाईटमुळे डोळ्यांसमोर अंधारी येण्याचे आजार जडतात. हे कार्यक्रम आयोजित करणारे एकतर राजकीय पुढारी अथवा त्यांचे कार्यकर्ते असतात. त्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अथवा सहायक पोलीस निरीक्षक यांना बोलावून त्यांचा सत्कार केला जातो. अधिकारी निघून गेले की मोठ्या आवाजात डीजे सुरू होतो. डीजे केवळ वाजतच नाही तर चांगले हादरे देऊन जातो. यामुळे परिसरात वास्तव्यास असणाºया नागरिकांना डोके, छातीत दुखणे याबरोबरच ऐकू न येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे या त्रासास सामोरे जावे लागते. परिणामस्वरूप त्यांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते, अशा तक्रारी सर्वत्र ऐकायला मिळत आहेत. याचबरोबर या आवाजाच्या हादऱ्यांचा परिणाम घरावरील लोखंडी पत्रे, कौले यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, नवजात बालके व लहान मुलांना होतो. काही डीजेचा आवाज तर एवढा भयानक असतो की, तो ऐकून कसला हा आवाज, असे म्हणण्याची व त्या आवाजापासून दूर जाण्याची धडपड सुरू होती. डॉक्टर मंडळींचेही डीजेवर नियंत्रण असायलाच हवे, त्याच्या मोठ्या आवाजाचे वाईट परिणाम लोकांना भोगावे लागतात, असे म्हणणे आहे. आवाजाने उत्सव साजरा करावा. पण त्याचा त्रास होणार नाही. प्रकृतीवर परिणाम होणार नाही, याची काळजीही मंडळांनी घ्यायला हवी. पोलिसांचे ही त्याकडे दुर्लक्ष होते. नियंत्रणाहून अधिक आवाज ठेवणाऱ्या डीजेवाल्यांवर दंडात्मक व त्वरित कारवाई व्हायला हवी, तरच हा अप्रकार बंद होणार, असे या दुकानदार व नागरिकांचे सार्वत्रिक मत आहे. एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर पोलिसांनी दिलेल्या परवानगीमध्ये आवाजावर मर्यादा असावी, असे नमूद केले जाते.तो कार्यक्रम रात्री १० नंंतर सुरू राहिला तर पोलीस हस्तक्षेप करून तो बंद करण्याचा आदेश देतात. यामुळे श्रोते नाराज होऊन घरी परततात. तेच पोलीस सर्वोच्च न्यायालयाने बंदीचा आदेश देवूनही डीजेवर मेहरबान का? हा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे...........वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर लोणी काळभोर पोलीस ठाणे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पोलीस ठाण्याचे वतीने कोणासही मोठ्या आवाजात डीजे लावण्याची परवानगी देण्यात येत नाही. यापुढील काळात नियमांचे उल्लंघन होत आहे, हे निदर्शनास आले तर डीजे जप्त करून चालक, मालक व मंडळाचे पदाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करणार आहोत. तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरmusicसंगीतHealthआरोग्य